अन् मंदिरातच रंगली चोरट्यांची रासलीला, नागरिकांनी दिला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 05:00 IST2020-10-15T05:00:00+5:302020-10-15T05:00:36+5:30
मंगळवारी दुपारच्या सुमारास एक जोडपे पोद्दार बगिचा परिसरातील मंदिरात आले. सध्या सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद असल्याने या मंदिरात नेहमीपेक्षा वर्दळ कमीच होती. याचाच फायदा घेऊन चोरट्याने मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. धारदार शस्त्राने तो दानपेटी फोडत होता. मात्र, त्याच्याकडून दानपेटी फूटत नसल्याने सुमारे एक ते दीड तास त्याचे प्रयत्न सुरू होते. चोरटा थकला त्याने सोबत आलेल्या महिलेशी मंदिर परिसरातच रासलीला सुरु केली.

अन् मंदिरातच रंगली चोरट्यांची रासलीला, नागरिकांनी दिला चोप
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एक जोडपे चोरी करण्यासाठी मंदिरात शिरले. दानपेटी फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, दानपेटी फुटली नसल्याने अखेर त्या जोडप्याने चक्क मंदिर परिसरातच रासलीला सुरु केली. मात्र, ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी त्यांना पकडून चांगलाच चोप दिला. स्थानिक पोद्दारबगिचा परिसरातील मंदिर परिसरात ही घटना घडली.
मंगळवारी दुपारच्या सुमारास एक जोडपे पोद्दार बगिचा परिसरातील मंदिरात आले. सध्या सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद असल्याने या मंदिरात नेहमीपेक्षा वर्दळ कमीच होती. याचाच फायदा घेऊन चोरट्याने मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. धारदार शस्त्राने तो दानपेटी फोडत होता. मात्र, त्याच्याकडून दानपेटी फूटत नसल्याने सुमारे एक ते दीड तास त्याचे प्रयत्न सुरू होते. चोरटा थकला त्याने सोबत आलेल्या महिलेशी मंदिर परिसरातच रासलीला सुरु केली.
महिलेला आलिंगन देत चुंबन घेतल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. परिसरातील नागरिकांना ही बाब लक्षात येताच नागरिकांनी एकत्र येत या चोरट्या जोडप्याला पकडून चांगलाच चोप दिला.
मंदिरात चोरी करणारा चोरटा गजाआड
शहरातील हनुमान टेकडी परिसरात असलेल्या मंदिरात चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. टेकडी परिसरात असलेल्या मंदिरात काही दिवसांपूर्वी चोरट्याने दानपेटी फोडून पुजाऱ्याचा मोबाईल चोरुन नेला होता. या प्रकरणाचा तपास रामनगर ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघाली गावंडे यांनी करुन अमरावती जिल्ह्यातील शहापूर येथील प्रफुल्ल रमेश पाटणकर याला त्याच्या निवासस्थानाहून अटक केली. पुढील तपास पंकज भरणे करीत आहेत.