शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांचा ‘डिझेलबंदी’ आदेश केवळ कागदोपत्रीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:01 IST

देवळी तालुक्यातील विविध वाळू घाटांवर हीच परिस्थिती असल्याने याला आळा घालण्यासाठी एप्रिल महिन्यात तहसीलदारांनी डिझेलबंदीचे आदेश काढून तब्बल ५० वाहनांना डिझेल देण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला होता. पण, यातील बहुतांश वाहने आजही वाळू चोरीकरिता रस्त्यावर धावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देसंचारबंदीतही वाळू चोरटे सैराट : बंदीतील वाहनेच कारताहेत वाळूची वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यामध्ये संचारबंदी असतानाही मोठ्याप्रमाणात वाळू चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. रात्रीला नदीपात्र तसेच नाल्यातही अवैधरित्या उपसा सुरु आहे. देवळी तालुक्यातील विविध वाळू घाटांवर हीच परिस्थिती असल्याने याला आळा घालण्यासाठी एप्रिल महिन्यात तहसीलदारांनी डिझेलबंदीचे आदेश काढून तब्बल ५० वाहनांना डिझेल देण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला होता. पण, यातील बहुतांश वाहने आजही वाळू चोरीकरिता रस्त्यावर धावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.देवळी तालुक्यात मोठ्याप्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु आहे. या तालुक्यालगतच यवतमाळ जिल्ह्याची हद्द लागून असल्याने वर्धा नदीपात्राचा अर्धा भाग वर्धा तर अर्धा भाग हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये येतो.याचाच फायदा घेत वर्धा जिल्ह्यातील वाळू चोरटे नदीपात्राची चाळण करीत आहे. तालुक्यातील हिवरा (कावरे), गुंजखेडा, तांबा (येंडे) यासह इतरही लहानमोठ्या घाटातून वाळू चोरी सुरु आहेत. अद्याप जिल्ह्यातील एकाही वाळू घाटांचा लिलाव झाला नसला तरी शहरासह विविध भागातील बांधकामावर वाळू उपलब्ध होत आहे.संचारबंदीच्या काळातही देवळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीत ज्या वाहनांवर अवैध वाळू वाहतुकीसंदर्भात कारवाई करण्यात आली. अशा जवळपास ५० वाहनांना डिझेल देऊ नयेत, असे आदेश तहसीलदार राजेश सरवदे यांनी एप्रिल महिन्यात काढले होते.त्यांनी या आदेशात सर्व वाहनांचे क्रमांक नमूद करुन डिझेल पंपधारकांना सूचना दिल्या होत्या. पण, त्यानंतरही आदेशात नमूद असलेल्या क्रमांकाची वाहने सर्रास वाळू चोरीकरिता वापरली जात आहे. त्यामुळे तहसीलदारांचा आदेश कागदोपत्रीच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या आदेशाची कठोर अंमलबजावणी करुन डिझेल देणाऱ्यावरही कारवाईची गरज आहे.वाळू चोरीला आळा घालण्याकरिता दोन वर्षामध्ये ज्या वाहनांवर अवैध वाळू वाहतुकीसंदर्भात कारवाई करण्यात आली. अशा सर्व वाहनांना डिझेल देऊ नयेत, असा आदेश पारीत केला होता. यामध्ये जवळपास ५० वाहनांचा समावेश असून त्याचे क्रमांकही डिझेल पंपधारकांना देण्यात आले होते. सुरुवातीचे दोन महिने यासंदर्भात कडक अंमलबजावणी करण्यात आली. जर आदेशात नमूद केलेली वाहने वाळू चोरीकरिता धावत असलेल तर पुन्हा नव्याने याकडे लक्ष दिले जाईल.- राजेश सरवदे, तहसीलदार, देवळी.कारवाईतून वाळू चोरटे कोसो दूरतालुक्यात अवैध वाळू चोरीबाबत घाटांवर अधुनमधून कारवाई करण्यात आल्या. गुंजखेडा घाटावरही तीन ते चार वेळा कारवाई करुन घाटातील केवळ तराफेच नष्ट करण्यात आले. मात्र, वाळू चोरटा कोण, याचा शोध घेण्यात कारवाई पथक अपयशी ठरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वाळू चोरटे आणि तहसील कार्यालयातील काही कर्मचारी यांची साठगाठ असल्याने कारवाईची सर्व माहिती वाळू चोरट्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे कारवाईमध्ये तराफे किंवा वाळूसाठा दिसून येतो पण; आरोपी सापडत नाही, हे वास्तव आहे.रात्रीच्या वाळू वाहतुकीला ‘अर्थपूर्ण’ बळकोविड-१९ च्या प्रकोपामुळे जिल्ह्यात संचारबंदी असतानाही वाळू चोरटे मात्र, रात्रभर वाळू उपसा करण्यात व्यस्त आहे. वाळू भरलेली वाहने ही रस्त्यानेच जात असून ती महसूल आणि पोलीस प्रशासनाला कसे काय दिसत नाही, हा प्रश्नच आहे. वर्धा-यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरुन येणारी वाळू देवळी शहरासह वर्ध्यातही पोहोचत असल्याने या सर्व वाळू भरलेल्या वाहनांच्या वाहतुकीला ‘अर्थपूर्ण’ बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. यातून काही कर्मचाऱ्यांचा खिसा गरम होत असला तरी शासनाचा मोठा महसूल बुडत आहे, हे विसरुन चालणार नाही. 

टॅग्स :Socialसामाजिक