शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षकांची वणवण भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 10:00 PM

शाळा सुरू होण्यास थोडाच अवधी शिल्लक असताना पालक विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत गुंतला आहे. शिक्षक विद्यार्थी आपल्या शाळांकडे आकर्षित करण्यात लागला आहे. यासाठी विविध प्रलोभने दिली जात असल्याचेही दिसून येत आहे.

ठळक मुद्देनामवंत शाळांकडेच पालकांच्या रांगा : ग्रामीण भागात सरकारी, खासगी शाळांत पटसंख्या कमीच

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शाळा सुरू होण्यास थोडाच अवधी शिल्लक असताना पालक विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत गुंतला आहे. शिक्षक विद्यार्थी आपल्या शाळांकडे आकर्षित करण्यात लागला आहे. यासाठी विविध प्रलोभने दिली जात असल्याचेही दिसून येत आहे.खासगी संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी खासगी शाळांचे शिक्षक गट करून विद्यार्थ्यांच्या शोध मोहिमेला वेग देत आहेत. संस्थेतर्फे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात अनेकांनी विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश मोफत, घरून शाळेपर्यंत व शाळेतून घरापर्यंत पोहोचविण्यासाठी सेवाही पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय अन्य आकर्षक प्रलोभने दिली जात आहे. अनेकांची आॅफर स्वीकारून विद्यार्थी इकडल्या शाळेतून तिकडे, असा प्रकारही पाहायला मिळत आहे. यात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या विद्यार्थ्यांचा नामवंत शाळांकडे रांगा लागत आहेत तर अन्य शाळांना मात्र विद्यार्थ्यांसाठी वणवण फिरावे लागत आहे. विद्यार्थ्यांची गणपूर्ती करण्यासाठी अनेक शिक्षक तर स्व-खर्चातून विद्यार्थ्यांना प्रलोभन देत आहेत. मराठी शाळांची विद्यार्थी संख्या दरवर्षी कमी होत असल्याने शाळा टिकविणे हे उद्दिष्ट संस्थांचे आहे. त्याचा अंतिम परिणाम हा शिक्षकांवर होत असल्याने आणि नोकरी तेथेच टिकावी या अपेक्षेने विद्यार्थी शोधमोहिम सुरू आहे. अनेकांनी आपले उद्दिष्ट साध्य केले असले तरी लहान शाळांत अद्यापही विद्यार्थ्यांची वाणवाच दिसत आहे. उत्पन्न कमी असलेल्या पालकांचा गटही आता कॉन्व्हेंट संस्कृतीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे. यामुळे मराठी शाळा ओस पडत आहेत. दिवसेंदिवस ही परिस्थिती गंभीर होत असल्याने पूढे मराठी शाळांचे भवितव्य काय, मराठीचे भवितव्य काय, असा प्रश्न उभा ठाकतोय. मराठीचा वाणवा आपल्या मराठी राज्यात जाणवत असला तरी विदेशात मात्र मराठी भाषेचे आकर्षण वाढत आहे. या विरोधाभासाचे विचित्र चित्र उमटत असल्याने आश्चर्यही व्यक्त होत आहे.राज्य शासनाच्या योजनेंतर्गत २५ टक्के राखीव जागेत प्रवेश मिळावे म्हणून अनेकांनी अर्ज केले; पण अद्याप अंतीम प्रवेश प्रक्रियेला गती आली नाही. यामुळे पालकांची चिंता वाढत आहे. अन्य संस्थांच्या शिक्षकांचा प्रवेशासाठी तगादा वाढतच आहे. नामवंत शाळेत पाल्याला प्रवेश मिळावा म्हणूनही धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.मराठी वाचवादिवसेंदिवस मराठी शाळातील विद्यार्थी संख्या रोडावत चालल्याने शाळांची संख्याही घटतच आहे. ग्रामीण भागात जि.प. च्या शाळांना विद्यार्थीच नाहीत. शिक्षकांची कमतरता, इमारत आणि संसांधनांची कमी यामुळेच अधिकाधिक शाळा समस्येच्या गर्तेत सापडल्या आहेत. खासगी शिक्षण संस्थांची तत्परता आणि गतिशील नियोजन यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी त्या शाळांकडे वळत आहे. परिणामी, ग्रामीण शाळांत विद्यार्थी संख्यो रोडवली आहे. कशाबशा शाळा चालताहेत, हे वास्तव आहे. खासगी शाळांनाही पूरेशी विद्यार्थी संख्या मिळत नसल्याने नामवंत नसलेल्या शाळातील वर्ग तुटत असून अतिरिक्त शिक्षक या समस्येला सामोरे जावे लागत आहे. हाच वेग कायम राहिल्यास मराठी शाळा बंद झाल्यास नवल नसावे. शासनाचे धोरण नेमके कुठल्या दिशेने जाते, हे स्पष्टच होत नसून मराठी वाचेल काय, मराठी भाषा, मराठी संस्कृतीची वाढ खुंटणार की काय, अशी ओरड होताना दिसून येत आहे. 

टॅग्स :Schoolशाळा