टँकरने दुचाकी चालकास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:12 IST2019-05-25T22:12:20+5:302019-05-25T22:12:45+5:30
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या टँकरचालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने चालवून दुधाचा वाटप करून परतीचा प्रवास करणाऱ्या दुचाकीचालकाला चिरडले. ही घटना स्थानिक मॉडेल हायस्कूल भागातील पुलावर शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. शुभम पुरुषोत्तम चारोडे (२०) रा. खुबगाव, असे मृतकाचे नाव आहे.

टँकरने दुचाकी चालकास चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या टँकरचालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने चालवून दुधाचा वाटप करून परतीचा प्रवास करणाऱ्या दुचाकीचालकाला चिरडले. ही घटना स्थानिक मॉडेल हायस्कूल भागातील पुलावर शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. शुभम पुरुषोत्तम चारोडे (२०) रा. खुबगाव, असे मृतकाचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार, खुबगाव येथील शुभम चारोडे हा नेहमीप्रमाणे एम.एच. ३२ के ७१० क्रमांकाच्या दुचाकीने दुध घेऊन आर्वी येथे आला होता. नियोजित ठिकाणी दुधाचा वाटप केल्यानंतर तो दुचाकीने परतीचा प्रवास करीत होता. दुचाकी मॉडेल हायस्कूल भागातील पुलाजवळ आली असता पाणी घेऊन जाणाºया एम.एच. १५ जी. ८०९४ क्रमांकाच्या टँकरने त्याला जबर धडक दिली.
आरोपी टँकरचालक इतक्यावरच थांबला नाही तर त्याने घटनास्थळावरून पळ काढताना गंभीर जखमी झालेल्या शुभम याला टँकरच्या चाकाखाली घेत घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी टँकरचालकाविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आर्वी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक धीरज बांडे करीत आहे.