शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा विधानसभा मतदार संघातील रणजित कांबळे समर्थकांचे राजीनामे घ्या, शेखर शेंडेची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 18:16 IST

वर्धा विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांत माजी मंत्री आमदार रणजित कांबळे यांनी पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणावर आपल्या समर्थकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

वर्धा - वर्धा विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांत माजी मंत्री आमदार रणजित कांबळे यांनी पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणावर आपल्या समर्थकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ते कायम आपल्या विरोधात काम करीत आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी  त्यांचे पहिले राजीनामे घ्या; त्यांनी जर आपल्या विरोधात प्रचार केला तर आपण रणजित कांबळेंच्या विरोधात जाहीरपणे मंचावर जाऊन प्रचार करू, असा निर्वाणीचा इशारा काँग्रेसचे प्रदेश सचिव शेखर शेंडे यांनी दिला.यासंदर्भात त्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, कार्याध्यक्ष डॉ.नितीन राऊत, यशोमती ठाकूर यांनाही माहिती दिली आहे. वर्धा मतदारसंघात शेखर शेंडे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे पक्षाची उमेदवारी मागितली आहे. माजी विधानसभा उपाध्यक्ष दिवंगत प्रमोद शेंडे यांचे ते सुपुत्र आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शेंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.यापूर्वी दोन विधानसभा निवडणुकीत रणजित कांबळे गटाच्या लोकांनी आपल्याविरोधात जाहीर प्रचार केला व आपला पराभव केला. हीच पुनरावृत्ती यावेळीही होण्याची शक्यता आहे. रणजित कांबळे समर्थक असलेले सेलू तालुका काँग्रेस अध्यक्ष तशी जाहीर वाच्यता करीत आहेत. त्यामुळे अशा वातावरणात निवडणूक लढणे योग्य होणार नाही. त्यामुळे पक्षाने वर्धा विधानसभा मतदार संघातील रणजित कांबळे समर्थक असलेल्या पदाधिका-यांचे राजीनामे घेऊन त्यांना कार्यमुक्त करावे; देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघात जाहीररीत्या रणजित कांबळे यांच्या विरोधात सभा घेऊन प्रचार करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आता काँग्रेस या सदंर्भात काय निर्णय घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मागील दोन विधानसभा निवडणूकीत आपण रणजीत कांबळे समर्थकांनी विरोधात काम केल्यामुळे पराभूत झालो. आताही तीच वेळ येवू शकते. सेलूचे तालुकाध्यक्ष विजय जयस्वाल जाहिररीत्या आपले काम करणार नाही, असे वक्तव्य करीत आहे. त्यामुळे कांबळे समर्थक सर्व पदाधिकाºयांचे राजीनामे घ्यावे, अशी आपण पक्षाकडे मागणी केली आहे.- शेखर शेंडे, प्रदेश सचिव, महाराष्ट्र  प्रदेश काँग्रेस.

टॅग्स :congressकाँग्रेसwardha-acवर्धाRanjit Kambaleरणजित कांबळेPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019