उपविभागीय कार्यालयासमोर धरणे
By Admin | Updated: August 7, 2015 02:03 IST2015-08-07T02:03:30+5:302015-08-07T02:03:30+5:30
येथील वणा नदी पाणी बचाओ संघर्ष समितीच्यावतीने वर्धेच्या कंपनीला येथून पाणी घेण्यासाठी विरोध दर्शविण्याकरिता गुरुवारी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.

उपविभागीय कार्यालयासमोर धरणे
हिंगणघाट : येथील वणा नदी पाणी बचाओ संघर्ष समितीच्यावतीने वर्धेच्या कंपनीला येथून पाणी घेण्यासाठी विरोध दर्शविण्याकरिता गुरुवारी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. याच वेळी पत्रकार परिषद घेण्यात घेत उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगांवकर यांना विरोधाचे निवेदन सोपविण्यात आले.
यावेळी संघर्ष समितीचे प्रा. दिवाकर गमे, मनोज रूपारेल, संतोष तिमांडे, सेवानिवृत्त मुख्य अभियंता धर्मराज रेवतकर, सुनील राऊत, सुरेश सातोकर, नरेंद्र चुंबळे, प्रविण उपासे, सौरभ तिमांडे, राकेश शर्मा, रूपेश लाजुरकर, केशव तितरे, भारत पवार, सुभाष धोटे, पुंडलीक बकाने, कमलाकर बोकडे, विजय एनपुतवार, विजय गुप्ता, प्रमोद जुमडे, नरेंद्र पांढरे, महेश खडसे, प्रदीप महल्ले, किशोर पांडे, अनिल हटवार, मिलिंद कोटेकार, विजय धोटवत, घनश्याम झिले, शंकर मुंजेवार, उमेश झोटींग, महीपाल रामटेके आदी उपस्थित होते.
यावेळी धर्मराज रेवतकर, प्रा. दिवाकर गमे, संतोष तिमांडे, राकेश शर्मा यांनी वणा नदी पाणी बचाव संघर्ष समितीची भूमिका विषद केली. या प्रकरणात शासकीय अधिकाऱ्यांना दबावाखाली आणून वायगाव पासून पाईप टाकण्याचे काम सुरूच असल्याचे सांगितले.
येथून ४५ कि.मी वरील या कंपनीला हिंगणघाटच्या वणा नदीतून उद्योगासाठी पाणी देवू नये म्हणून गत चार महिन्यापासून येथे जनआंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात अनेक निवेदने देण्यात आली, तरीही या कंपनीकडून पाईप लाईन टाकण्याचे काम सुरूच आहे.
येथील वणा नदी पात्रातून ८.७३ दहा लक्ष घन मिटर पाणी उचल करण्याची परवानगी जलसंपदा मंत्रालयाच्या एका पत्रान्वये २६ फेब्रुवारी २०१० ला देण्यात आली. त्यावेळी या कंपनीने या संबंधीच्या अटी व शर्तीनुसार तीन महिन्याच्या आत संबंधीतांशी करारनामा केला नाही. पाच वर्षानंतर या कंपनीने हिंगणघाट ते भुगाव पर्यंतच्या एक मिटर व्यासाची पाईप लाईन टाकण्याच्या कामाला प्रारंभ करताच सदर आंदोलन करण्यात आले आहे.(तालुका प्रतिनिधी)