शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यावर कारवाई केल्याने विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

मोई (तांडा) येथील रामकिसन सरदार राठोड (४५) यांच्याकडे सव्वाचार एकर शेती आहे. सततची नापिकी व दुष्काळाने त्यांनी आधीच धसका घेतला होता. साडेचार लाखाचे कर्जही होते. अशातच त्यांना घरगुती वापराचे बिल आले. मात्र परिस्थिती अभावी बिल भरले नाही. ७ ला त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यांना सार्वजनिक वीजेच्या खांबावर हूक टाकून घरी पुरवठा सुरू केला.

ठळक मुद्देअभियंता,लाईनमनवर कारवाई करा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : घरगुती वापराचा वीजपुरवठा बिल न भरल्याने महावितरण कंपनीच्या अभियंत्याने खंडीत केला होता. यासाठी १५ हजार दंडही ठोठावला. कारवाईच्या भितीपोटी शेतकºयाने विषप्राशन करून आत्महत्या केली. सदर घटना बुधवारी घडली. याप्रकरणी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी कुटुंबियांसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.मोई (तांडा) येथील रामकिसन सरदार राठोड (४५) यांच्याकडे सव्वाचार एकर शेती आहे. सततची नापिकी व दुष्काळाने त्यांनी आधीच धसका घेतला होता. साडेचार लाखाचे कर्जही होते. अशातच त्यांना घरगुती वापराचे बिल आले. मात्र परिस्थिती अभावी बिल भरले नाही. ७ ला त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यांना सार्वजनिक वीजेच्या खांबावर हूक टाकून घरी पुरवठा सुरू केला. याची माहिती वायरमन ढोबळे यांना मिळाली. त्यांनी अभियंता अतकरे यांना कळविले. अतकरे यांनी राठोड यांच्याघरी धाड टाकली. मीटर व वायर जप्त केला. १५ हजारांचा दंडही दिला.या कारवाईचा धसका घेतल्याने त्यांनी १३ ला आष्टीच्या वीज वितरण कंपनी कार्यालयात येवून न्याय मागितला. ७५० रुपये बिल भरतो. कारवाई करू नका. दंड माफ करा अशी विनंती केली. मात्र अभियंता अतकरे यांनी काहीही ऐकुन न घेता शेतकºयांला धमकावले. अभियंत्याच्या धमकीमुळे वैफल्यग्रस्त रामकिसन राठोड यांनी मोई गाव गाठले. दुपारी १ वाजता घरातच विषारी औषध प्राशन केले. गावकºयांना माहिती होताच उपचारासाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टर गैरहजर असल्याने त्यांच्यावर कोणीही उपचार केले नाही. त्यांना आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील आहे. याप्रकरणी अभियंता अतकरे, लाईनमन ढोबाळे यांच्या विरोधात आष्टी पोलिसात तक्रार देण्यात आली. जिल्हाधिकाºयांना निवेदन पाठविण्यात आले. शवविच्छेदन झाल्यावर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.शेतकºयाने माझ्याकडे येवून माहिती दिली असती तर उपाययोजना करता आली असती याप्रकरणी वरिष्ठांना माहिती देण्यात आली. अभियंता व लाईनमन यांची चौकशी करून अहवाल वरिष्ठांना पाठविला जाणार आहे.-आर.एम. खडसे, उपविभागीय अभियंता, वीज वितरण कंपनी, आष्टी (शहीद).

टॅग्स :Deathमृत्यू