शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीच्या पतीकडून प्राध्यापकास मारहाण

By admin | Updated: May 16, 2016 02:22 IST

कॉपी प्रकरण निपटल्यानंतर पेपर सुटताच सदर परीक्षार्थीच्या पतीने प्रा. डॉ. पांडे यांना महाविद्यालयाच्या आवारात मारहाण करून सेंटरवर

आर्वीचे कॉपी प्रकरण : खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोपआर्वी : कॉपी प्रकरण निपटल्यानंतर पेपर सुटताच सदर परीक्षार्थीच्या पतीने प्रा. डॉ. पांडे यांना महाविद्यालयाच्या आवारात मारहाण करून सेंटरवर सर्वांना कॉपी करू द्या असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.घडलेल्या घटनेची तक्रार डॉ. पांडे यांनी आर्वी पोलिसात दिली. सदर रिपोर्ट दिल्याच्या तब्बल तीन तासानंतर परीक्षार्र्थीने प्रा. डॉ. पांडे विरूद्ध आर्वी ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. परीक्षा केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार झाला नाही. पोलिसांनी या घटनेबाबत कुठलीही सत्यता जाणून न घेता प्रा. पांडे विरूद्ध ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल केल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. आर्वी पोलिसांनी द्वेषापोटी पांडे यांचे विरूध्द कुठलीही चौकशी न करता गुन्हा दाखल करून त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवल्याची व या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून न्याय देण्याची मागणी एका निवेदनातून जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली आहे. तसेच सदर विद्यार्थिनीच्या पतीनेही आकसापोटी हा प्रकार केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे सबंधितांवार कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार त्यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, पोलीस महासंचालक, आ. अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे यांच्याकडे केली आहे.(तालुका प्रतिनिधी) परीक्षा केंद्रावर कॉपी करताना हटकले असता परीक्षार्थीच्या पतीनेच मला मारहाण करून आपल्या पत्नीला माझ्याविरूद्ध विनयभंगाची तक्रार करण्यास लावली. शिवाय तिच्या पतीने मला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. परीक्षा केंद्रावर कॉपी करू न देत असल्याबद्दल माझ्या विरूद्ध हे षडयंत्र रचले आहे. -प्रा. डॉ. श्यामप्रकाश पांडे, परीक्षा केंद्राधिकारी, आर्वी