शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना राहावे लागते उपाशी

By admin | Updated: January 28, 2015 23:37 IST

येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अन्न पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून मानकानुसार जेवण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागत आहे. असा आरोप करून वसतिगृहात

मागासवर्गीय वसातिगृहात समस्यांचा अंबार : समाजकल्याण कार्यालयात आंदोलन वर्धा: येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अन्न पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून मानकानुसार जेवण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागत आहे. असा आरोप करून वसतिगृहात अन्नपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला बदलविण्याची मागणी येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. याकडे समाजकल्याण विभागाने दुर्लक्ष केल्याने बुधवारी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी आंदोलन केले. समाजकल्याण सहायक आयुक्त आंदोलनस्थळापासून गेले मात्र त्यांनी यावर कुठलीही चर्चा केली नाही. सायंकाळपर्यंत विद्यार्थी तिथेच बसून होते. शैक्षणिक वर्ष २०१४-१५ च्या सुरुवातीपासून भोजन पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून होत असलेल्या अनागोंदीच्या अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. या विषयाबाबत अनेकदा वसतिगृह गृहपाल व समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली. कायमस्वरुपी तोडगा निघाला नसल्याने विद्यार्थ्यांना पुरवठाधारकाकडून वारंवार त्रासाला व अनियमिततेला सामोरे जावे लागत आहे. १५ आॅगस्ट २०१४ व त्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्येही भोजन पुरवठाधारक बदलविण्याबाबत विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. यावेळी समाजकल्याण विभागाकडून मिळालेल्या आश्वासनाच्या आधारावर विद्यार्थ्यांनी त्यांची मागणी परत घेतली होती. या आश्वासनावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांना वेळेवर नाश्ता मिळत नाही, फळांचा नियमित पुरवठा होत नाही. शिवाय मानकानुसार सकाळी दूध देणे गरजेचे असताना तेही मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या तुलनेत दूध कमी येत आहे. त्यात वाढ करण्याची मागणी केली असता दुधात पाणी टाकूण देण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. शिवाय भोजन पुरवठाधारक विद्यार्थ्यांच्या हातून ताट हिसकावून घेत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. जेवणासाठी वापरल्या जाणारे खाद्य तेल, आटा, दाळ, तांदुळ यांचा दर्जा निकृष्ट असल्याचाही आरोप आहे. यात विद्यार्थ्यांना काही मागणी केल्यास मद्यधुंद अवस्थेत वसतिगृहात येवून विद्यार्थ्यांना शिवीगाळ करीत असल्याचेही विद्यार्थ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याकरिता जोपर्यंत समाजकल्याण सहायक आयुक्त येत नाही तोपर्यंत येथून आम्ही हलणार नाही, अशी भूमिका अमित दिवे, विकेश तिमांडे, गिरीधर चंदनखेडे, सुदर्शन भगत, निलेश मेश्राम, पवन घंगाळे, रोशन खडसे, सुरज वानखेडे यांच्यासह विद्यार्थ्यांनी घेतली.(प्रतिनिधी)