शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी निवाऱ्याकरिता विद्यार्थी रस्त्यावर

By admin | Updated: July 28, 2014 23:39 IST

तालुक्याचे ठिकाण असलेल्या या गावात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रवासादरम्यान बसची प्रतीक्षा करताना उभे राहण्याकरिता कुठलीही व्यवस्था नाही. येथे नवे बसस्थानक तयार करण्यात आले

तहसील कार्यालयावर मोर्चा : विविध मागण्यांचे निवेदन सादरसमुद्रपूर: तालुक्याचे ठिकाण असलेल्या या गावात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रवासादरम्यान बसची प्रतीक्षा करताना उभे राहण्याकरिता कुठलीही व्यवस्था नाही. येथे नवे बसस्थानक तयार करण्यात आले मात्र त्याचा नागरिकांना कुठलाही उपयोग नाही. यामुळे संतापलेल्या येथील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी विविध मागण्यांचे निवदेन तहसीलदार तिनघसे यांना देण्यात आले. समुद्रपूर हे तालुक्याचे ठिकाण असून येथे प्रशासकीय कार्यालये, महाविद्यालय व अन्य कामाकरिता बाहेगावावरून विद्यार्थी तसेच नागरिक येत असतात. परंतु गत सात ते आठ वर्षापासून प्रवाशांना थांबण्याकरिता प्रवासी निवारा नाही. पावसाचे दिवस सुरू आहेत. अशात विद्यार्थ्यांना व प्रवाशांना पान टपरी, चाहाची टपरी व इतर दुकानाचा आधार घ्यावा लागतो. नवीन बसस्थानक हे समुद्रपूरपासूप १ किलो मिटरच्या बाहेर आहे. तिथे कोणी जायला तयार नाही. बसस्थानकावर पिण्याचे पाण्याची व्यवस्था नाही. येथे येणाऱ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना होणारा त्रास टाळण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्याची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लावण्याबाबत मागणी करण्यात आली. या वेळी करण्यात आलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आठ दिवसांनंतर तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे विद्यार्थी संघटनेने दिला आहे. तहसीलदारांना निवदेन देताना आशिष अंड्रस्कर, मनिष गांधी, अमोल व सौरभ साळवे यांच्यासह योगेश आसुटकर, याज्ञिक सोनुलकर, पंकज रोक, अतुल चौधरी, आकाश चाफले, अर्जून करवे, वैभव साळवे, रज्जत साळवे, व विद्यार्थी उपस्थिती होती.(तालुका/शहर प्रतिनिधी)