शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

राणे रुग्णालयात प्रसूताच्या मृत्यूने तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 5:00 AM

राणे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात आल्यानेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांकडून करीत तशी तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. गौरी अभिजीत डवरे  (२८) रा. नेताजी वॉर्ड असे महिलेचे नाव आहे. शहरातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता शनिवारी ऑन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : येथील राणे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात आल्यानेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांकडून करीत तशी तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. गौरी अभिजीत डवरे  (२८) रा. नेताजी वॉर्ड असे महिलेचे नाव आहे. शहरातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता शनिवारी ऑन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. राजेश कुटे, नायब तहसीलदार विनायक मगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वल देवकाते, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वावरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल गौरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.  आर्वी येथील राणे हॉस्पिटल येथे गौरी अभिजीत डवरे हिला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सिझर करण्यात आले. गौरी हिने गोंडस मुलीला जन्म दिला. परंतु, गौरी हिला जास्त प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याने व ते गौरीचा पती अभिजित याच्या निदर्शनास असल्याने त्यांनी याची माहिती नर्सला दिली. नर्सने  याची माहिती डॉ. कालिंदी राणे यांना दिली. परंतु, दीड तासांचा कालावधी लोटूनही डॉक्टर आले नाहीत. अशातच गौरीची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. याला डॉक्टर जबाबदार असल्याचे गौरीचे कुटुंबिय म्हणतात.

अन् हलविले उपजिल्हा रुग्णालयात- रात्री १० वाजताच्या सुमारास गौरीची प्रकृती खालवल्याने तिला सुरुवातीला आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, रक्त उपलब्ध नसल्याने वर्धा येथील जिल्हा रुग्णालयातून रक्ताच्या दोन बाटल्या बोलावण्यात आल्या. परंतु, तत्पूर्वीच गौरीचा मृत्यू झाला.

नातेवाइकांनी व्यक्त केला प्रचंड रोष- गौरीच्या मृत्यूनंतर तिच्या  कुटुंबीयांनी एकच रोष व्यक्त केल्याने रुग्णालय प्रशासनात चांगलाच गोंधळ उडाला होता. गौरीच्या कुटुंबीयांनी या दु:खाच्या प्रसंगी स्वत:ला कसेबसे सावरत आर्वी पोलिसात तक्रार नोंदविली.डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी- कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शनिवारी दिवसभर राणे  हॉस्पिटल समोर पोलिसांचा बंदोबस्त होता. या प्रकरणाची चौकशी करून दोषी डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आर्वीच्या ठाणेदारांना भेटून  अभिजित डवरे, नगरसेवक रामू राठी, गौरव जाजू, छोटू शर्मा आदींनी केली.

गौरी हिचे सिझर पाच वाजता झाले. तर पाच तासानंतर रुग्णात गुंतागुंत निर्माण झाली. त्याला मी आणी माझ्या चमूने व्यवस्थितरित्या हॅन्डल केले. परंतु आम्हाला त्यात यश मिळाले नाही. मागील २० वर्षांपासून मी रुग्णसेवा देत आहे. या काळात सात हजारांच्यावर प्रसूती आपण केल्या आहेत. परंतु, असा प्रसंग पहिल्यांदाच ओढावला.- डॉ. कालिंदी राणे, प्रसूती तज्ज्ञ, राणे हॉस्पिटल, 

 

टॅग्स :Deathमृत्यूhospitalहॉस्पिटल