शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरेच्या पुरस्काराविरोधात वर्धेत रास्ता रोको

By admin | Updated: August 19, 2015 02:19 IST

राज्य शासनाने बाबासाहेब पुरंदरे यांना देऊ केलेला महाराष्ट्रभूषण पुरस्कार रद्द करावा, या मागणीकरिता संभाजी ब्रिगेड, ...

नागपूर महामार्गावर जाळपोळ : तासभर वाहतुकीचा खोळंबावर्धा : राज्य शासनाने बाबासाहेब पुरंदरे यांना देऊ केलेला महाराष्ट्रभूषण पुरस्कार रद्द करावा, या मागणीकरिता संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडसह विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी नागपूर महामार्गावर टायरची जाळपोळ करून निषेध नोंदविला. यावेळी किमान तासभर या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. बुधवारी पुरंदरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्याच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी राजा शिवछत्रपती या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला, इतिहासाचे विकृतीकरण केले, असा या संघटनांचा आरोप आहे. पूर्वग्रहदूषित बुद्धीने शिवचरित्राची मांडणी करून आयुष्यभर समाजात तेढ निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या पुस्तकात चुकीचा इतिहास आहे. त्यामुळे पुरंदरे यांनी इतिहासलेखनाशीदेखील द्रोह केला आहे. पुरंदरेंना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करणे म्हणजे खोट्या इतिहासाला प्रतिष्ठा मिळवून देणे होय, असेही संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांचे म्हणणे आहे. राज्यभरातील पुरोगामी संघटना, नामवंत साहित्यिक, इतिहासतज्ज्ञांनी पुरंदरे यांनी लिहिलेल्या पुस्तकांची शहानिशा केल्यानंतरच हा पुरस्कार द्यायला पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.