शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या सुपरफास्ट प्रवासी गाड्यांचा थांबा द्या

By admin | Updated: July 22, 2014 00:00 IST

सेवाग्राम ते चंद्रपूर दरम्यान असलेल्या येथील रेल्वे स्थानकावर अनेक सुपरफास्ट प्रवासी रेल्वेगाड्या थांबत नाहीत. यामुळे नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना मोठाच त्रास सहन करावा लागतो.

हिंगणघाट : सेवाग्राम ते चंद्रपूर दरम्यान असलेल्या येथील रेल्वे स्थानकावर अनेक सुपरफास्ट प्रवासी रेल्वेगाड्या थांबत नाहीत. यामुळे नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना मोठाच त्रास सहन करावा लागतो. येथील रेल्वेस्थानकावर सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा थांबा देण्यात यावा, अशी मागणी रेल यात्री संघाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत खासदार रामदास तडस यांना निवेदनही सादर करण्यात आले.भाजपा शाखेच्यावतीने नवनिनर्वाचित खासदार रामदास तडस यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यानिमित्त शहरात दाखल झालेल्या खासदारांना हिंगणघाट रेल्वे यात्री संघाच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. यात काही सुपरफास्ट रेल्वे गाड्या येथील रेल्वेस्थानकावर थांबत नसल्याचे सांगण्यात आले. यात सिकंदराबाद-बिकानेर, चेन्नई-जोधपूर, धनबाद-कोल्हापूर, नागपूर-सिंकदराबाद, पुणे-पटना, रामेश्वर-वाराणसी, कोल्हापूर-धनबाद, येर्णाकुलम-पटना, सिंकदराबाद-पटना आदी प्रवासी रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. हिंगणघाट येथील बाजारपेठ विदर्भात मोठी म्हणून ओळखली जाते. दूरवरचे व्यापारी येथे खरेदीसाठी येतात; पण हे शहर रेल्वेच्या सुपर गाड्यांच्या थांब्यापासून उपेक्षित आहे. यामुळे दूरचे व्यापारी येथे येण्याचे टाळतात. यामुळे स्पर्धा तोकडी पडत असल्याने शेतकरीही योग्य भावापासून वंचित राहतात. शिवाय येथील कर्मचारी व विद्यार्थी दररोज अपडाऊन करतात. ठराविकच गाड्यांचा थांबा असल्याने कर्मचारी, विद्यार्थ्यांना मर्यादित वेळच आपल्या कार्याला देता येतो. केंद्रात सत्ता असल्याने शेतकरी, व्यापारी, कर्मचारी व विद्यार्थी वर्गाची व्यथा जातीने रेल्वेमंत्र्यांना साकडे घालून दूर करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. यावेळी खासदार तडस यांनी आपला प्रश्न निश्चित मार्गी लागेल, असे आश्वासन यात्री संघास दिले. निवेदन सादर करताना जयंत मानकर, संजय ढगे, प्रदीप नागपूरकर, विवेक लोढा, शंतनू दवंडे, दिलीप राठी, आंनद ठमके, बोंडे, रूपेश कापकर, नरेश जोशी, चंद्रशेखर खापरे, राजू पिसे, महेश बोमीडवार, केशव तितरे यांच्यासह यात्री संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)