शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

तोंड आवरा अन् विद्यार्थ्यांची गळती थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 23:49 IST

येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक राजेंद्र सोमनकर यांच्याबाबत बऱ्याच तक्रारी आहेत. मुख्याध्यापकांच्या मनमर्जी कामाच्या विरोधात एकवटलेल्या ग्रामस्थांनी शाळेवर धडक देत ‘गुरूजी तोंड आवरा अन् विद्यार्थ्यांची गळती थांबवा’ अशी मागणी केली.

ठळक मुद्देमागणी : संतप्त ग्रामस्थांसह पालक धडकले शाळेवर

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक राजेंद्र सोमनकर यांच्याबाबत बऱ्याच तक्रारी आहेत. मुख्याध्यापकांच्या मनमर्जी कामाच्या विरोधात एकवटलेल्या ग्रामस्थांनी शाळेवर धडक देत ‘गुरूजी तोंड आवरा अन् विद्यार्थ्यांची गळती थांबवा’ अशी मागणी केली.स्थानिक जि. प. उच्च प्राथमिक शाळेत सात वर्ग आहेत. त्याची पटसंख्या २०९ आहे. यापूर्वीच्या मुख्याध्यापिका रजनी माथनकर व शिक्षक वर्गाने गावकºयात विश्वास निर्माण केला होता. त्यामुळे पटसंख्या वाढली. शिस्तप्रिय म्हणून पूर्वीच्या मुख्याध्यापकांना ओळखले जात होते. त्यांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही सहकार्य करीत होते. याचमुळे सेलू पं. स. मध्ये आकोलीची शाळा नावारूपाला आली; पण अवघ्या १५ दिवसात येथील नव्या मुख्याध्यापकाच्या कार्यप्रणालीला ग्रामस्थ कंटाळले आहे. त्यांच्याकडून पालकांना असभ्यतेची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करीत संतप्त पालकांनी अखेर गावातील गटतटाचे राजकारण विसरून थेट शाळेवर धडक दिली. याप्रसंगी सरपंच पुष्पा खैरकार, माजी पं. स. सदस्य अमित गोमासे, अरविंद काकडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लालचंद सोळंक, ग्रा.पं.सदस्य मनोहर सायरे, रमेश काकडे, अमोल अनकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दीपक गव्हाळे, विजय चिचघरे, सुखदेव गांजुळे, प्रशांत तिमाने, श्याम हिवसे, गोलू बावणे, छबू नेहारे, बेबी गोमासे, ज्ञानेश्वर सायरे, नामदेव गोमासे आदींनी समस्यांचा पाढाच वाचला. शिवाय मुख्याध्यापकाला चांगलेच धारेवर धरल्याने वरिष्ठांकडून योग्य कार्यवाही गरजेची आहे.पालकांना दिली जाते उडवाउडवीची उत्तरेनव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक विविध समस्या घेऊन आलेल्या पालकांना उडवा-उडवीची उत्तरे देत चक्क शाळेतून तुमच्या मुलाला तुम्ही कमी करा असा सल्लाच देतात. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर पालकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. याकडे जि.प. शिक्षण विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देत कारवाई करण्याची मागणी आहे.काही लोकांनी आपल्याकडे भ्रमणध्वनीवरून तक्रारी केल्या; पण कुणाचीही प्रत्यक्ष लेखी तक्रार आपल्याला प्राप्त झालेली नाही. संतप्त गावकºयांनी शाळेवर धडक दिल्याची माहिती मला मिळाली आहे. पालकांची समस्या जाणून घेण्यासाठी केंद्र प्रमुखांना शाळेला भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मी स्वत:ही शाळा गाठून माहिती जाणून घेईल.- संजय वानखेडे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, सेलू.माझा मुलगा तिसरीत शिकतो. त्याच्या पायाला काच लागल्याने त्याला गंभीर स्वरूपाची इजा झाली. असे असतानाही जखमी विद्यार्थ्यावर साधा प्रथमोपचार करण्यात आला नाही. उलट त्या विद्यार्थ्यांच्या आईलाच मुख्याध्यापक मनात येईल असे वाईट बोलले.- बाबा गोमासे, पालक़माझ्या मुलाला शाळेतीलच काही मुल मारहाण करीत असल्याने त्यांना समज देण्यात यावी, असे आपण मुख्याध्यापकांना सांगितले. मात्र, मलाच खरी-खोटी सुनाविण्यात धन्यता मानली.- छबू नेहारे, पालक़विद्यार्थ्याची आजी, मामा शाळेत गेल्यावर त्यांना उलट सुटल उत्तरे देऊन अपमानास्पद वागणूक देण्यात आली.- धरम सोळंकी, पालक़ 

टॅग्स :educationशैक्षणिकSchoolशाळा