शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्क विभागाची ‘ब्राईट’ हॉटेलवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 06:00 IST

निवडणुकीच्या काळात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी तसेच आचारसंहितेचे कुठेही उल्लंघन होऊ नये त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने जिल्हाभरात कारवाईला गती दिली आहे. यातूनच बुधवारी रात्री पावणे दहा वाजता नागपूर मार्गावरील हॉटेल ब्राईटमध्ये धाड घातली तेव्हा हॉटेलमध्ये विदेशी दारूच्या विविध कंपनीच्या २६७ बाटल्या आढळून आल्या. या दारूची किंमत ४९ हजार ८८० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देविदेशी दारूसाठा जप्त : रामनगर पोलिसांच्या डुलक्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर, नालवाडी, हिंदनगर व सिंदी (मेघे) परिसरात खुलेआम दारूविक्री होत असताना रामनगर पोलिसांचे याकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष होत आहे. याच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नालवाडी परिसरातील हॉटेल ब्राईटमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड घालून विदेशी दारूसाठा जप्त केला. त्यामुळे येथील दारूविक्रीची माहिती रामनगर पोलिसांना नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.निवडणुकीच्या काळात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी तसेच आचारसंहितेचे कुठेही उल्लंघन होऊ नये त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने जिल्हाभरात कारवाईला गती दिली आहे. यातूनच बुधवारी रात्री पावणे दहा वाजता नागपूर मार्गावरील हॉटेल ब्राईटमध्ये धाड घातली तेव्हा हॉटेलमध्ये विदेशी दारूच्या विविध कंपनीच्या २६७ बाटल्या आढळून आल्या. या दारूची किंमत ४९ हजार ८८० रुपये असल्याचे सांगण्यात आले.हा सर्व दारूसाठा जप्त करून हॉटेल मालकाला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त मोहन वरदे, अधीक्षक सुभाष बोडखे यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे निरीक्षक पी. जी. सावंत, दुय्यम निरीक्षक एस.डी.घुले, उपनिरीक्षक भावना धिरड तसेच कर्मचारी यु. बी. शहाणे, के.टी. डोंगरे, जी. एस. बावणे व आर. एम. म्हैसकर यांनी केली.अनेक हॉटेल्समध्ये मिळते दारूनागपूर मार्गालगत अनेक हॉटेल आहेत. येथे अनेक दिवसांपासून अवैध दारूविक्री केली जाते. शिवाय, येथे रिचविण्याचीही व्यवस्था असल्याने या हॉटेल्सना सायंकाळनंतर गार्डन बारचे स्वरूप येते. मात्र, रामनगर पोलिस कारवाईचे धाडस दाखवित नाही. किरकोळ दारूविक्रेत्यांवर नाममात्र छापे घालून कारवाईचे सोंग करीत आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी