व्यावसायिकसह अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सोबत सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 05:00 IST2021-08-08T05:00:00+5:302021-08-08T05:00:28+5:30
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याकरिता प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या प्रवेश परीक्षा साधारण जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये होतात. तर विद्यापीठाचे निकाल जलै ते ऑगस्ट मध्ये लागतात. त्यानंतर लगेच अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू होत असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी अव्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळतात. परिणामी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

व्यावसायिकसह अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सोबत सुरू करा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बोर्डाचे तसेच विद्यापीठाचे निकाल लागल्यानंतर लगेच व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा घेणे अत्यंत महत्वाचे आहे. शासनाने व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सोबतच सुरू करावे, अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनातून केली असल्याची माहिती जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकर प्रसाद अग्निहोत्री यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याकरिता प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या प्रवेश परीक्षा साधारण जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये होतात. तर विद्यापीठाचे निकाल जलै ते ऑगस्ट मध्ये लागतात. त्यानंतर लगेच अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू होत असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी अव्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळतात. परिणामी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. याचे मुख्य कारण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा ही खूप उशिरा होतात. परिणामी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अनेक जागा रिक्त राहतात. राज्यात इंजिनिअरींग च्या १,५५,००० जागा आहेत. त्यापैकी ६०,००० रिक्त आहेत. फार्मसीच्या ३४०० जागा आहेत त्यापैकी १५०० जागा रिक्त आहेत. एम. बी. ए.च्या ४३०० जागा आहेत. त्यापैकी १७०० जागा रिक्त आहेत. विधी अभ्यासक्रमाच्या ३०,००० जागा आहेत त्यापैकी ७००० जागा रिक्त आहेत. एमसीएच्या ८०० जागा आहेत. ज्यापैकी ३०० जागा रिक्त आहेत. बी. एड. च्या ३७,००० जागा आहेत त्यापैकी १४००० जागा रिक्त आहेत. पॉलिटेक्निकच्या १,४२,००० जागा आहेत. त्यापैकी ८०,००० जागा रिक्त आहेत. एकूणच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या जवळपास ५० टक्के जागा रिक्त राहतात. नागपूर विद्यापीठाने अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू होतील. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षाची वाट पहावी लागणार आहे. ज्या की खुप उशिरा होणार आहेत. हा एक प्रकारचा दुजाभाव व शैक्षणिक विषमता असून शासनाने हा शैक्षणिक खोळंबा रोखण्याकरिता व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सोबतच सुरू करावे. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाबाबतीत अडचणी येणार नाहीत, अशी मागणी आपण निवेदनातून केल्याचे यावेळी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी सांगितले.