शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

खादी विचार, मूल्य व जनमनावर उभी राहावी

By admin | Updated: September 18, 2016 00:51 IST

गांधी विचार व कार्यावर माझी निष्ठा व आस्था आहे. खादीच्या कामांना कसे पुढे नेता येईल. याचा विचार करण्याची वेळ, प्रसंग आता आलेला आहे.

रामचंद्र राही : शांती निकेतन येथील खादी सभेचा दुसरा दिवस, देशातील प्रतिनिधींची उपस्थितीसेवाग्राम : गांधी विचार व कार्यावर माझी निष्ठा व आस्था आहे. खादीच्या कामांना कसे पुढे नेता येईल. याचा विचार करण्याची वेळ, प्रसंग आता आलेला आहे. पुंजीवादी केंद्रीत व्यवस्था निर्माण झाल्याने मुठभर लोकांच्या हातात देशाचा निर्णय केंद्रीत झालेला आहे. वास्तविक पुंजीद्वारे श्रमाचा योग्य विनियोग व उपयोग व्हायला पाहिजे; पण तसे होताना दिसत नसल्याने खादी क्षेत्राची अवस्था बिकट होत आहे. खादी विचार, मूल्य जनमनावर उभी राहिल्याचे पूर्वीचे वैभव प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही, असे विचार गांधी स्मारक निधी दिल्लीचे मंत्री रामचंद्र राही यांनी व्यक्त केले.नई तालीम समितीच्या शांती भवनमध्ये खादी सभा सुरू असून शनिवारी दुसऱ्या दिवशी खादी संस्थांचे प्रतिनिधी संस्थाच्या समस्या व सरकारची निती यावर विचार विचार व्यक्त करीत आहे.रामचंद्र राही पुढे म्हणाले, भारत सरकारपुढे खादी एक आयटम आहे. कॉटनची क्रेज वाढल्यास अधिक नफा मिळेल. म्हणून खादीचे दर्शन आजच्या अर्थव्यवस्थेच्या विरूद्ध उभी असल्याचे दिसते. सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही म्हणाले, स्वच्छता अभियानात गांधी विचारांचा समावेश गरजेचा आहे. गांधीजींनी सफाई शस्त्र बनविले. शौचालयाचे विभिन्न प्रकार त्यांनी तयार करून खताचा यशस्वी व उपयोगी प्रयोग आपल्या समोर आहे. देशात पुंजीवाद वाढत आहे. बँकेचे कर्ज माफ करून बँकेचे दिवाळे व खाजगीकरणाचा डाव सरकारचा असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी उत्तर प्रदेशचे विश्वेश्वरनाथ तिवारी, ब्रह्मनाद शुक्ला इत्यादींनी मनोगत व्यक्त केले. सभेचे संचालन इंदोरचे पुष्पेंद्र दुबे यांनी केले.(वार्ताहर) सर्व इतिहासजमा झाल्याने खादी युगाला नव्या प्रारंभाची गरजखादी सोबत अनेक रचनात्मक कार्य जुळलेले आहे. यावर कार्य करणाऱ्यांची एक जमात होती. आता सर्व इतिहास जमा झाल्याने खादी युगाला नव्याने सुरूवात करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. संस्थांसमोर नव्या समस्या व अडचणी निर्माण करण्याचे काम देशस्तरावर होत आहे. खादी रोजगार देण्याचे नाही तर ग्राम स्वराज्य सिद्ध करते. गावातच बनून गावातील लोक त्याचा उपयोग करेल. तिच आदर्श ग्राम योजना सरकारची योजना नफ्याची असल्याने बाजारीकरणावर अधिक भर आहे. यातून ग्रामीण कारागिरांचे शोषण होत आहे. खादी क्षेत्र मागे पडत असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली. सभेला महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, बिहार, हरियाना, गुजरात तामीळनाडू, कर्नाटक, आसाम, पंजाब, हिमाचल प्रदेश आदि राज्यातील प्रतिनिधी उपस्थित आहे.