शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याच्या पुरामुळे रापमची बस अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST

वर्धा-हिंगणघाट मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने वर्धा-मनसावळी एम.एच. ४० एन.८९९३ क्रमांकाची बस भिवापूर मार्गे नेण्यात आली. मात्र, मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तळेगाव व भिवापूरच्या मधोमध असणाऱ्या नाल्याला पूर आला.

ठळक मुद्देभिवापूर येथील घटना : शैक्षणिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वायगाव (नि.) नजीकच्या भिवापूर गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरामुळे हिंगणघाट मार्गे मनसावळीला जाणारी बस अर्ध्या प्रवासातच अडकली. मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ही परिस्थिती ओढावली असली तरी विद्यार्थ्यांना मात्र शैक्षणिक फटकाच सहन करावा लागला.वर्धा-हिंगणघाट मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने वर्धा-मनसावळी एम.एच. ४० एन.८९९३ क्रमांकाची बस भिवापूर मार्गे नेण्यात आली. मात्र, मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तळेगाव व भिवापूरच्या मधोमध असणाऱ्या नाल्याला पूर आला. पूर्वीच या नाल्यावरील पुलाची उंची कमी आहे. अशातच मुसळधार झालेल्या पावसामुळे नाल्याच्या पाणी पातळीत वाढ होत पुराचे पाणी नाल्याच्या पुलावरूनही वाहत होते. परिणामी, बसही पुढील प्रवासासाठी जाऊ शकली नाही. या बसमध्ये सुमारे ३० प्रवासी होते. शिवाय या प्रवाशांपैकी जास्तीत जास्त प्रवासी शिक्षणासाठी ये-जा करणारे विद्यार्थी होते. परंतु, नियोजित ठिकाणी बसच पोहोचू शकली नसल्याने याचा शैक्षणिक फटकाच त्यांना सहन करावा लागला आहे. पुरामुळे शाळेत न पोहोचू शकणाºया विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांचे प्रॉक्टिकल व मुलाखत होत्या. परंतु, त्यापासून मुकावे लागले आहे.

टॅग्स :state transportएसटीfloodपूर