ST Accident: एसटी बस पुलावरून नदीत पडता पडता वाचली, चालकाचे प्रसंगावधान, वाचले ५५ प्रवाशांचे प्राण
By अभिनय खोपडे | Updated: October 28, 2022 21:23 IST2022-10-28T21:22:27+5:302022-10-28T21:23:12+5:30
ST Accident: वर्धेवरून आर्वीला जाणारी परिवहन महामंडळाची बस सेलू तालुक्यातील पुलावरून खाली कोसळताना वाचली.सदर घटना ७.३० वाजता घडली.

ST Accident: एसटी बस पुलावरून नदीत पडता पडता वाचली, चालकाचे प्रसंगावधान, वाचले ५५ प्रवाशांचे प्राण
- अभिनय खोपडे
आर्वी / वर्धा : वर्धेवरून आर्वीला जाणारी परिवहन महामंडळाची बस सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील धाम नदीच्या पुलावरून खाली कोसळताना वाचली.सदर घटना ७.३० वाजता घडली.
एम एच ४०/ ५२९७ क्रमांकाची आर्वी आगाराची जादा बस वर्धावरून सात वाजता निघाली मात्र येळाकेळी पुलाजवळ येतात चालक अचानक दचकला आणि बसवरील त्यांचे नियंत्रण सुटले त्यामुळे बस पुलाचा कठडे तोडून काही भाग पुलाखाली आली मात्र प्रसंगावधान राखून चालकाने बसवर पुन्हा नियंत्रण मिळविले.
त्यामुळे सर्व वाचले बस जर खाली पडली असती तर अनेकांचे जीव गेले असते चालक अमोल भांगे यांच्या डोळ्याला मात्र मार लागला आहे एक प्रवासी किरकोळ जखमी आहे बसमधील ५५ ते ५७ प्रवासी होते या बसवर राहून इथापे वाहक होते या संदर्भातली अधिक माहिती मिळू शकली नाही.