व्हॅक्सिनेशन मोहिमेला गती देण्यासाठी स्पॉट रजिस्टेशन उपयुक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 05:00 AM2021-05-13T05:00:00+5:302021-05-13T05:00:07+5:30

रविवार ९ मे रोजीपर्यंत कोविडच्या लसीचे २ लाख ४१ हजार १४९ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले. यापैकी लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १ लाख ९८ हजार ५०० आहे तर लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या ४२ हजार ६४९ असल्याचे सांगण्यात आले. लसीकरण मोहिमेला सर्वच वयोगटातील नागरिकांचा सध्या स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत असला तरी शासनाकडून अतिशय अल्प लस वर्धा जिल्ह्याला देऊन जिल्ह्याची लसकोंडीच केली जात आहे.

Spot registration is useful to speed up the vaccination campaign | व्हॅक्सिनेशन मोहिमेला गती देण्यासाठी स्पॉट रजिस्टेशन उपयुक्तच

व्हॅक्सिनेशन मोहिमेला गती देण्यासाठी स्पॉट रजिस्टेशन उपयुक्तच

Next
ठळक मुद्देसेकंड डोस घेणाऱ्यांची संख्या झाली २१ हजार

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा : ४५ पेक्षा जास्त वर्ष वयोगटातील सामान्य व्यक्तींना ऑनलाईन नाेंदणी तसेच स्पॉट रजिस्टेशन हे दोन पर्याय उपलब्ध करून कोविडची प्रतिबंधात्मक व्हॅक्सिन दिली जात आहे. परंतु, १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना केवळ ऑनलाईन नोंदणी करून अपॉईमेंट घेतल्यावरच लस दिली जात आहे. रविवारपर्यंत १ लाख ७३ हजार ६९ सामान्य व्यक्तींनी कोविडच्या लसीचा पहिला तर २५ हजार २५७ व्यक्तींनी व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला आहे. असे असले तरी लस घेणाऱ्यांपैकी १ लाख ५० हजार ९८ व्यक्तींनी लसीचा पहिला तर २१ हजार ९५ व्यक्तींनी लसीचा दुसरा डोस थेट लसीकरण केंद्र गाठत स्पॉट रजिस्टेशन करूनच घेतल्याने स्पॉट रजिस्टेशन हा पर्याय व्हॅक्सिनेशन मोहिमेला गती देण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.
प्राप्त माहितीनुसार, रविवार ९ मे रोजीपर्यंत कोविडच्या लसीचे २ लाख ४१ हजार १४९ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले. यापैकी लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १ लाख ९८ हजार ५०० आहे तर लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या ४२ हजार ६४९ असल्याचे सांगण्यात आले. लसीकरण मोहिमेला सर्वच वयोगटातील नागरिकांचा सध्या स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत असला तरी शासनाकडून अतिशय अल्प लस वर्धा जिल्ह्याला देऊन जिल्ह्याची लसकोंडीच केली जात आहे. सर्वच वयोगटातील लाभार्थ्यांसाठी मुबलक लस मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनातील आरोग्य विभागातील अधिकारी प्रयत्न करीत असले तरी त्यांच्या प्रयत्नांना पाहिजे तसे यश मिळत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळे या विषयात विविध राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी एकत्र येत वर्धा जिल्ह्यासाठी मुबलक लससाठा कसा मिळविता येईल यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. लस तुटवड्यामुळे सध्या १८ ते ४४ तसेच ४५ पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देणे बंद आहे.

रविवारपर्यंत १,७३,०६९ सामान्य नागरिकांनी लसीचा पहिला तर २५ हजार २५७ व्यक्तींची लसीचा दुसरा डोस घेतला आहे. लस घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये स्पॉट नोंदणी करून लस घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे.
- डॉ. प्रभाकर नाईक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

Web Title: Spot registration is useful to speed up the vaccination campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.