शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

स्वयंस्फूर्तपणे अन् शांततेत वर्धेकरांनी पाळला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 11:44 PM

जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले. या शहीद झालेल्या जवानांमध्ये दोन जवान महाराष्ट्रातील असून दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा सध्या सर्वस्तरातून निषेध होत आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी बंदची हाक देण्यात आली होती.

ठळक मुद्देशहिदांच्या स्मरणार्थ व्यापाऱ्यांनी काढला शहरातील मुख्य मार्गाने मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले. या शहीद झालेल्या जवानांमध्ये दोन जवान महाराष्ट्रातील असून दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा सध्या सर्वस्तरातून निषेध होत आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी बंदची हाक देण्यात आली होती. याला वर्धेकरांनी स्वयंस्फूर्तपणे प्रतिसाद देत शांततेत बंद पाळला.स्थानिक व्यापाºयांनी शनिवारी सकाळी एकत्र येत वर्धा शहरातून शहिदांच्या स्मरणार्थ मोर्चा काढला. मोर्चा कच्छी लाईन येथे पोहोचल्यावर तेथे पुलवामा येथील घटनेत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व्यापाºयांच्या मोर्चाने ‘अमर रहे शहीद, जवान अमर रहे’ अशा घोषणा देत वर्धा शहरातील प्रमुख मार्गाने क्रमण केले. शनिवारी वर्धा शहरातील कापड व्यावसायिक, सराफा, अनाज व्यावसायिक, कृषी व्यावसायिक, औषधी विक्रेता आदींनी आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. पुलवामा येथील घटनेचा बदला घेत, दहशतवाद्यांना मदत करणाºया पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी तात्काळ कठोर पाऊल उचला, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.कार्यालये सुरूचशनिवारी बंदच्या हाकेला वर्धेकरांनी स्वयंस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. बहुतांश व्यापाºयांनी आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली. मात्र, विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालये सुरू होती. शिवाय रापमची बससेवाही सुरू राहिल्याने विविध कामानिमित्त संबंधित कार्यालयांमध्ये येणाºयांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही.कापड व्यावसायिक पाठविणार शहिदांच्या परिवारांसाठी निधीपुलवामा येथील घटनेत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना लोकवर्गणी करून निधी पाठविण्याचा मानस स्थानिक कापड व्यावसायिकांचा आहे. त्या अनुषंगाने वर्र्ध्यातील १५३ कपडा व्यावसायिक प्रत्येकी ५०० रुपये गोळा करून ती रक्कम सेंट्रल बँक आॅफ इंडियाने शहीद परिवारासाठी तयार केलेल्या बँक खात्यात जमा करणार आहेत. त्यानंतर ही रक्कम बँकेच्या सहकार्याने शहीद जवानांच्या कुटुंबीयांकडे वळती होणार असल्याचे टिबडीवाल यांनी सांगितले.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला