सोयाबीनला हमीपेक्षा कमी भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST2019-10-26T06:00:00+5:302019-10-26T06:00:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : तालुक्यातील शेतकऱ्यांचा जवळपास ६० ते ७० टक्के माल निघाला आहे. शेतकरी आपला शेतमाल मार्केटमध्ये ...

सोयाबीनला हमीपेक्षा कमी भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : तालुक्यातील शेतकऱ्यांचा जवळपास ६० ते ७० टक्के माल निघाला आहे. शेतकरी आपला शेतमाल मार्केटमध्ये विकायला जात असतांना शेतकऱ्यांना तुमचा माल ओला आहे. या सबबीखाली सोयाबीनचे हमी भावांपेक्षा कमी भाव देण्यात येत असल्याची शेतकºयाची ओरड आहे.
पहिलेच पावसामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनला उतारा कमी मिळाला आहे. काही मालाची गुणवत्ता ही घसरल्यासारखी दिसत आहे. त्यामध्ये शेतकरी आपला माल मार्केटमध्ये विकण्याकरिता आणल्यानंतर तुमचा माल ओला आहे या सबबीखाली लुट होत आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे, असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. शेतकरी आपला माल पाण्यात न सापडता चांगला पध्दतीने निघावा याकरिता थ्रेशर मशीन वाल्याला दामदुप्पटीने पैसे देत आहे.
असे असले तरी मार्केटमध्ये आल्यानंतर मात्र त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकºयांमध्ये कमालीचा रोष आहे.
शेतकºयांकडून विकण्याकरिता आणलेली सोयाबीन १४ ते १५ टक्के ओले असल्यास ३२०० ते ३३०० रूपये भाव मिळत आहे. त्याचप्रमाणे १८ ते २० टक्के माल ओला असल्यास १९०० ते ३००० रूपये प्रतिकिंटल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकºयाच्या माल जरी कमी प्रमाणात ओलसर असला तरी तुमचा माल अधिक प्रमाणात ओला आहे. असे सांगून भाव कमी देत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे दररोज शेकडो पोते माल खरेदी केल्या जात आहे. १४ आॅक्टोंबरला सोयाबीन खरेदीचा शुभारंभ झाला असून आजपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीने ३००० पोते सोयाबीन खरेदी केली.
दिवाळीमुळे बाजारसमितीत आवक वाढली
दिवाळी सण तोंडावर आलेला असल्याने अनेक शेतकरी सोयाबीन निघताच थेट शेतातून कृषी उत्पन्न बाजार समितीत माल घेऊन येत आहे. त्यामुळे आर्वी, हिंगणघाट, देवळी, सेलू या बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे. बाजारपेठेत सध्या सोयाबीनला ३४०० रूपयांवर भाव दिला जात आहे. मोठ्या शेतकऱ्यांनी अजूनही शेतमाल विक्रीसाठी आणलेला नाही ते भाववाढीची प्रतीक्षा करीत आहेत.
हमी भावापेक्षा सोयाबीनचे भाव कमी मिळत आहे. माल थोडा ओलसर असल्यामुळे प्रमाणापेक्षा अधिकच कमी भाव दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.
- गजानन राजेंद्र सावरकर, लाडेगाव
लहान शेतकºयाला दिवाळी सणासाठी पैसे लागणार आहे.त्यामुळे त्यांना सोयाबीन विकावे लागते. सोयाबीनला सध्या कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांवर अन्याय होत आहे.
- नितीन इरखडे, शेतकरी राजापूर