शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी सोयाबीन पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 21:45 IST

१५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास पावसाअभावी सोयाबीन पिकाला मोठा फटका बसण्यांची दाट शक्यता असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : स्प्रिंकलरने पाणी देणे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास पावसाअभावी सोयाबीन पिकाला मोठा फटका बसण्यांची दाट शक्यता असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.कापसाचे जुनेच बियाणे असल्याने मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी कापसावर बोंडअळी येणार या भितीने परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा वाढविला. यावर्षी पेरणी साधली. सोयाबीनची वाढ चांगली झाली. सुरुवातीपासून खंडीत स्वरूपाचा पाऊस येत गेल्याने आंतर मशागतीला वेळ मिळाला. परिणामी यावर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले होणार अशी आशा शेतकºयाना होती. त्यामुळे हे वर्ष सोयाबीनचे वर्ष आहे, अशी चर्चा शेतकºयांमधून ऐकायला मिळत असतानाच ऐन फुलोर येण्याच्या अवस्थेत हे पीक मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अडचणीत आले आहे. नक्षत्र बदलल्यावर पाऊस येईल, अशी शेतकºयांना आशा होती. पण ३-४ आॅगस्ट उलटून गेला, तरी पावसाचे चिन्ह नाही. हवामानाचा अंदाज संपूर्ण आॅगस्ट महिना कोरडा जाणार असे सांगत आहे. हा अंदाज खरा ठरला तर कोरडवाहू सोयाबीन हे पीक पुर्णत: नष्ट होण्याच्या स्थितीत राहिल. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.सोयाबीन हे पीक अल्पावधीचे पीक असून ४५ दिवसात ते फुलावर येते व ९० ते ९५ दिवसात कापणीला येते. या पीकाला शेवटपर्यंत सातत्यपूर्ण पावसाची गरज असते. पण यंदा पावसाचे अत्यल्प व त्यातही मोठा खंड यामुळे हे वर्ष अवर्षणाचे जाणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकंदरीत कापूस बोंडअळीने व सोयाबीन पावसाअभावी धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची झोप मात्र उडविली आहे. पाऊस न आल्यास सोयाबीनला सर्वाधिक धोका आहे.पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडचिकणी (जा.) शिवारात भर पावसाळ्याच्या दिवसात सोयाबीन पिकाला सिंचन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. हल्ली सोयाबीन पीक फुलांवर आली असून १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे फुलावर आलेले सोयाबीन पीक वाचविण्याकरिता शेतकरी धडपड करीत आहे. हीच परिस्थिती कोरडवाहू भागातील शेतकºयांची आहे. त्यांच्याकडे सिंचनाच्या सुविधा नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. जिल्ह्याच्या काही भागात भारनियमनाच्या वेळा वेगवेगळ्या आहे. त्यामुळे शेतकºयांना कधीकधी रात्रीच्या वेळीही सोयाबीन पीकाला ओलीत करावे लागत आहे. यासाठी रात्रपाळीचा मजूरही कामावर ठेवावा लागत आहे.