शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
4
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
5
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
6
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
7
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
8
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
9
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
10
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
11
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
12
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
13
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
14
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
15
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
16
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
17
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
19
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
20
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकी मानसिकता व राष्ट्रप्रेमाने भारावलेली पिढीच बदल करू शकते

By admin | Updated: November 18, 2014 23:01 IST

आज खऱ्या अर्थाने निर्भय, कर्तव्यदक्ष, साहसी, समयसुचकता व राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या नागरिकांची आपल्या देशाला नितांत गरज आहे़ यासाठी बालवयापासूनच सैनिकी मानसिकता व राष्ट्रप्रेम निर्माण करणारे

वर्धा : आज खऱ्या अर्थाने निर्भय, कर्तव्यदक्ष, साहसी, समयसुचकता व राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या नागरिकांची आपल्या देशाला नितांत गरज आहे़ यासाठी बालवयापासूनच सैनिकी मानसिकता व राष्ट्रप्रेम निर्माण करणारे प्रशिक्षण देण्याची गरज आहे़ केवळ सैनिकी मानसिकता व राष्ट्रप्रेमाने भारवलेली पिढीच बदल करू शकते, असे प्रतिपादन माजी प्राचार्य श्याम देशपांडे यांनी केले़ निसर्गरम्य ढगा येथे १६ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या प्रहारच्या १८६ व्या अ‍ॅडव्हेंचर कॅम्पच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते़ ‘प्रहार’ समाज जागृती संस्थेच्यावतीने ११ ते १६ नोव्हेंबर दरम्यान सहा दिवसीय प्रहार अ‍ॅडव्हेंचर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते़ शिबिरात ४४ एनसीसी छात्रसैनिकांचा सहभाग होता़ समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरोग तज्ज्ञ डॉ़ राजेंद्र बोरकर तर अतिथी म्हणून माजी प्राचार्य श्याम देशपांडे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, प्रहारचे अध्यक्ष तथा होमगार्ड जिल्हा समादेशक प्रा़ मोहन गुजरकर उपस्थित होते़ बेलखोडे यांनी कृतीशील नागरिक बनविण्यासाठी शिक्षणासह खेळ व साहसी प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले पाहिजे, असे सांगितले़ प्रास्ताविकातून प्रा़ गुजरकर यांनी ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना तरूणाईमध्ये रूजविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले़ डॉ़ बोरकर यांनीही मार्गदर्शन केले़शिबिरात ‘जंगल वाचवा पाणी वाचवा, वन्य प्राण्यांचे संरक्षण करा’ विषयावर चित्रकला व भाषण स्पर्धांचे तर ‘ग्राम स्वच्छता अभियान’ व आपत्ती व्यवस्थापनात तरूणांची भूमिका विषयावर संघचर्चा स्पर्धा घेण्यात आल्या़ शिबिरात पाच संघ तयार करून त्यांना डॉ़ पा़स़ खानखोजे, अशफाक उल्ला खान, उधमसिंग, सरदार भगत सिंग व राणी लक्ष्मीबाई या क्रांतीविरांची नावे देत त्यांच्या जीवनावर मार्गदर्शन करण्यात आले़ शिबिरार्थ्यांनी मातीचे किल्ले तयार करणे, बिन भांड्यांचा स्वयंपाक, पक्षी निरीक्षण व जंगलखोज उपक्रमात सहभाग घेतला़ संचालन प्रा़ रवींद्र गुजरकर यांनी केले तर आभार संतोष तुरक यांनी मानले़ शिबिराला अमोल तडस, चेतन सातपूते यांच्यासह सर्वांनी सहकार्य केले़(कार्यालय प्रतिनिधी)