वाहनासह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By Admin | Updated: June 21, 2017 00:49 IST2017-06-21T00:49:06+5:302017-06-21T00:49:06+5:30

ग्रामीण रुग्णालय परिसरात संशयित मालवाहु वाहन अडवून ४० पेट्या देशी दारूसह वाहन असा ६ लाख

Six lakh seized with vehicle | वाहनासह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

वाहनासह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

वडनेर पोलिसांची कारवाई : यवतमाळ जिल्ह्यातून आणली दारू
लोकमत न्यूज नेटवर्क
वडनेर : ग्रामीण रुग्णालय परिसरात संशयित मालवाहु वाहन अडवून ४० पेट्या देशी दारूसह वाहन असा ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ठाणेदार गजानन वासेकर व पथकाने केली.
वडनेर पोलिसांना एका वाहनातून देशी दारू वाहून नेली जात असल्याची माहिती मिळाली. यावरून दुपारी १ वाजता ठानेदार वासेकर व ताफ्याने ग्रामीण रुग्णालय चौकात सापळा रचला. यात सदर वाहन येताना दिसताच ते अडविले असता देशी दारूच्या ४० पेट्या आढळून आल्या. यावरून पोलिसांनी १ लाख ९२ हजार रुपयांची दारू व वाहन असा ५ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही दारू डोंगरखर्डाच्या जंगलातून (जि.यवतमाळ) वडनेर येथे उतरविली जाणार होती. यातील वाहन चालक मनोज बबन चाफले (२२) रा.बांबर्डा यास अटक केली असून दुसरा आरोपी संजय तन्नीरवार रा. येरला हा फरार झाला. ही कारवाई ठाणेदारासह कैलास दाते, राहुल गिरडे, नंदू हटवार, लक्ष्मण केन्दे व प्रवीण सदावर्ते यांनी केली.

Web Title: Six lakh seized with vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.