शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

साहेब...आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या हो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST

लॉकडाऊन झाल्याने समृद्धी महामार्गाचे काम ठप्प पडले. त्यामुळे अनेक मजूरवर्ग आहे तेथेच अडकून पडले. शासनाने शिथिलता आणत मजूरांना त्यांच्या स्वगृही पाठविण्याचा निर्णय घेतला. पण, कामगारांजवळ पैसे नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली. कंत्राटदाराने त्यांचे वेतन न केल्याने त्यांच्यसमोर संकट ओढावले आहे. यासंदर्भात कामगारांनी कंपनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

ठळक मुद्देकामगारांची आर्त हाक : वेतनासाठी ‘समृद्धी’च्या कामगारांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : नजीकच्या बोरी गावात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून कामावर परराज्यातील अनेक मजूर कामावर आहेत. लॉकडाऊनमुळे काम ठप्प पडल्याने अनेक कामगार कॅम्पमध्ये अडकले. शासनाने कामगारांना स्वगृही पाठविण्यास परवानगी दिल्याने कामगारांनी अ‍ॅफकॉन कंपनीच्या फाटकावर ठिय्या देत वेतन अदा करून आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या हो.. अशी आर्त हाक आंदोलनातून दिली.लॉकडाऊन झाल्याने समृद्धी महामार्गाचे काम ठप्प पडले. त्यामुळे अनेक मजूरवर्ग आहे तेथेच अडकून पडले. शासनाने शिथिलता आणत मजूरांना त्यांच्या स्वगृही पाठविण्याचा निर्णय घेतला. पण, कामगारांजवळ पैसे नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली. कंत्राटदाराने त्यांचे वेतन न केल्याने त्यांच्यसमोर संकट ओढावले आहे. यासंदर्भात कामगारांनी कंपनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पण, कुणीही कामगारांच्या समस्येबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले. पुलगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांनी आंदोनस्थळी भेट देत अ‍ॅफकॉनच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. ठाणेदारांनी यावर तोडगा काढून तुम्हाला घरी पाठविण्याचे आश्वासन कामगारांना दिल्याने कामगारांनी आंदोलन मागे घेतले.सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाअ‍ॅफकॉन कंपनीच्या प्रवेशद्वारावर कामगारांनी आंदोलन केल्याने कामगारांची गर्दी झाली होती. दरम्यान त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. ज्या कंत्राटदाराने परराज्यातून कामगार कामावर आणले होते. त्यापैकी काही कंत्राटदार लॉकडाऊनपूर्वीच आपल्या गावी परतले. त्यामुळे कामगारांचे वेतन रखडल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.कामगारांना स्वगृही पाठविण्यासाठी व्यवस्था केली आहे. शासकीय स्तरावर त्यांचे नाव लिहून त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे. उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.परप्रांतीय स्वगृही जाणाऱ्या मजुरांची नोंदणी सुरु आहे. बिहार १५७, झारखंड ६८, राजस्थान २१, तेलंगणा ३, महाराष्ट्र ९, छत्तीसगढ ५४ अशा ३१२ कामगारांना स्वगृही पाठविण्याची तयारी सुरू आहे.- विद्यासागर चव्हाण, तहसीलदार, आर्वी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या