शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

साहेब! धान्य संपले हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST

रोजगाराच्या शोधात विरुळ येथे नाथजोगी समाजाचे सहा कुटूंबातील सुमारे ३० ते ४० सदस्य विरूळ नजीक एका शेतात पाल टाकून वास्तव्य करीत आहे. स्टो, गॅस शेगडी दुरुस्ती किंवा पलंग विकणे हा त्यांचा मुळ व्यवसाय आहे. लॉकडाऊन असल्याने मागील महिन्यांपासून कामकाज ठप्प झाल्याने त्यांच्यासमोर अडचण निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसहा कु टूंबियांचा टाहो : नाथजोगीच्या कुटुंबाची व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कविरुळ (आकाजी) : मागील दोन महिन्यांपासून अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातून रोजगाराच्या शोधात विरूळ येथे आलेल्या नाथजोगी समाजाच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्याकडील धान्यसाठा संपत आला असून साहेब...धान्य संपले हो, अशी आर्त हाक ते प्रशासनाकडे करीत आहे.रोजगाराच्या शोधात विरुळ येथे नाथजोगी समाजाचे सहा कुटूंबातील सुमारे ३० ते ४० सदस्य विरूळ नजीक एका शेतात पाल टाकून वास्तव्य करीत आहे. स्टो, गॅस शेगडी दुरुस्ती किंवा पलंग विकणे हा त्यांचा मुळ व्यवसाय आहे. लॉकडाऊन असल्याने मागील महिन्यांपासून कामकाज ठप्प झाल्याने त्यांच्यासमोर अडचण निर्माण झाली आहे.सीमा बंद असल्याने कुटूंबीयांना गावाकडेही परत जाता येत नसल्याने लहान चिमुकल्यांना कडेवर घेऊन बसस्थानक परिसरालगतच्या शेतात पाल ठोकून ते वास्तव्य करीत आहेत. लॉकडाउनमुळे त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची माहिती आर्वी महसूल प्रशासनाला मिळताच १५ दिवसांपूर्वी त्यांना पाच किलो तांदूळ व गव्हाचे वाटप केले. पण, आता त्यांच्याकडील धान्यपुरवठा संपत आल्याने त्यांच्यावर संकट ओढावले असून आम्हाला धान्य द्या हो... अशी आर्त हाक प्रशासनाकडे ते करीत आहे. मात्र कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने याची दखल घेतली नाही. लॉकडाऊन संपेपर्यंत पुरेल एवढा धान्यसाठा त्यांना देण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.