शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच पायउतार

By admin | Updated: June 15, 2016 02:32 IST

सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या सरपंच सुषमा अरुण येसनकर व उपसरपंच मंगेश कांबळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

गैरप्रकार भोवला : १५ विरूद्ध २ मतांनी सरपंचाविरूद्ध ठराव पारितवर्धा : सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या सरपंच सुषमा अरुण येसनकर व उपसरपंच मंगेश कांबळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. याबाबत मंगळवारी दुपारी २ वाजता सिंदी मेघे ग्रा.पं. कार्यालयात तहसीलदार राहुल सारंग यांच्या अध्यक्षतेत विशेष सभा घेण्यात आली. यात १५ विरूद्ध २ मतांनी सरपंचावरील तर १४ विरूद्ध २ मतांनी उपसरपंचावरील अविश्वास ठराव पारित करण्यात आला. ग्रा.पं. सदस्यांना विश्वासात न घेता केली जाणारी कामे आणि गैरप्रकार सरपंच, उपसरपंचांना भोवला, अशी चर्चा आहे.सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीचा कारभार गत काही दिवसांपासून ढेपाळला होता. ग्रा.पं. सदस्यांना विश्वासात न घेता कामे करणे, ग्रा.पं. ची दिशाभूल करून रकमांचा अपहार करणे, मनमानी कारभार करणे आदी कारणे समोर करीत तब्बल १५ ग्रा.पं. सदस्यांनी सरपंच आणि उपसरपंचांविरूद्ध अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. याबाबत मंगळवारी तहसीलदार राहुल सारंग यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. सभेत ग्रा.पं. सदस्य विजय महेशगौरी, माधुरी मुडे, अमरदिप कांबळे, रेणुका कुबडे, अंजूताई घोडेस्वार, उत्कर्ष देशमुख, मनोज करडे, ज्योत्सना तेलरांधे, मनीषा महाकाळकर, चंदा कुभलकर, गौरी डेहनकर, श्याम मोहोड, सुप्रिया मोहोड, विवेक ढगे आणि अभिजीत भेंडाळे या १५ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने तर सरपंच सुषमा येसनकर व उपसरपंच मंगेश कांबळे यांनी विरोधात मतदान केले. सरपंच पद खुला प्रवर्ग महिला राखीव असल्याने एक तृतियांश म्हणजे १३ मते विरोधात गरजेची होती; पण १५ सदस्यांनी विरोधात मतदान केल्याने अविश्वास ठराव पारित करण्यात येत असल्याचे तहसीलदार सारंग यांनी जाहीर केले. यानंतर उपसरपंच मंगेश कांबळे यांच्यावरील अविश्वासावरही त्याच आरोपांखाली चर्चा करून मतदान घेण्यात आले. यात अविश्वास ठरावाच्या बाजूने १४ सदस्यांनी मतदान केले तर घोडेस्वार तटस्थ राहिल्या. विरोधात दोन मते पडल्याने उपसरपंचावरही १४ विरूद्ध २ मतांनी अविश्वास ठराव पारित करण्यात आला. परिणामी, सरपंच व उपसरपंचांना पायउतार केल्याचे तहसीलदार राहुल सारंग यांनी जाहीर केले.(कार्यालय प्रतिनिधी)