शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

शहीद भूषण दांडेकर अमर रहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 06:00 IST

मोरांगणा या छोट्याशा गावातून २०११ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात शहीद भूषण दांडेकर देशसेवेकरिता सैन्यात दाखल झाले. मराठा लाईट इफंन्ट्रीमध्ये ९ वर्षे सेवा दिली. यादरम्यान त्यांनी कुपवाडा, राजोरी, बिकानेर आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय रायफल या ठिकाणी सेवा दिली. त्यांची शेवटची पोस्टिंग कर्नाटक मधील बेळगाव येथे होती. कर्तव्यावर असताना १३ फेब्रुवारीला हृदयविकाराचा झटका आला.

लोकमत न्यूज नेटवर्कखरांगणा (मोरांगणा) : मोरांगणा येथील रहिवासी असलेला जवान भूषण दांडेकर यांचा हृदयविकाराने काल मृत्यू झाला. आज स्वगावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अमर रहे...अमर रहे...शहीद भूषण दांडेकर अमर रहे...अशा घोषणा देण्यात आल्या.मोरांगणा या छोट्याशा गावातून २०११ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात शहीद भूषण दांडेकर देशसेवेकरिता सैन्यात दाखल झाले. मराठा लाईट इफंन्ट्रीमध्ये ९ वर्षे सेवा दिली. यादरम्यान त्यांनी कुपवाडा, राजोरी, बिकानेर आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय रायफल या ठिकाणी सेवा दिली. त्यांची शेवटची पोस्टिंग कर्नाटक मधील बेळगाव येथे होती. कर्तव्यावर असताना १३ फेब्रुवारीला हृदयविकाराचा झटका आला. त्यात ते भोवळ येऊन खाली कोसळल्याने सुरुवातीला बेळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुण्यातील कमांडो रुग्णालयात हलविण्यात आले. येथेच त्यांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी सकाळी ११.३० वाजता त्यांचे पार्थिव मोरांगणा येथे आणण्यात आले. देशासाठी शहीद झालेल्या भूषणचे अंत्यदर्शन घेण्याकरिता पंचक्रोशीतील जनसमुदाय उसळला होता. दुपारी १२ वाजता गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी स्वागत करून अमर रहे...च्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मोरांगणा येथील शहीद स्मारकावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान भूषणच्या लहान भावाने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार दादाराव केचे, माजी आमदार अमर काळे, बाळा जगताप, जिल्हा परिषद सदस्य राजश्री राठी, पंचायत समिती सभापती हनुमंत चरडे, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विनायक मगर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. शिल्पा खरपकर, मराठा बटालियनचे नायब सुभेदार तेजस घागडे, नरेंद्र वैद्य, लक्ष्मीकांत टेंभरे, नरहरी बिडकर, सुधीर खोडके, मनोज पांडे, संदीप सोळंकी, सतीश वाणी, श्याम हरणे, मुरली चौधरी, रवी चौधरी, कर्नल चित्तरंजन चवडे, श्याम आकोलकर, ज्ञानेश्वर भुजबळ यांची उपस्थिती होती. पुलगाव येथील पथकाने आकाशात बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी खरांगणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक हुसेन कादर शहा यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा बंदोबस्त होता.