पोलीस कर्मचाऱ्याकडून युवतीचे लैंगिक शोषण

By Admin | Updated: December 5, 2015 09:08 IST2015-12-05T09:08:24+5:302015-12-05T09:08:24+5:30

युवतीसोबत प्रेम संबंध प्रस्थापित करून लग्नाचे आमिष देत तिचे लैंगिक शोषण केले. तसेच लग्नाला नकार दिला. याबाबत पीडिताने शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून ....

Sexual harassment of the victim by a police employee | पोलीस कर्मचाऱ्याकडून युवतीचे लैंगिक शोषण

पोलीस कर्मचाऱ्याकडून युवतीचे लैंगिक शोषण

शहर ठाण्यात गुन्हा दाखल : लग्नाचे आमिष देत केले शोषण
वर्धा : युवतीसोबत प्रेम संबंध प्रस्थापित करून लग्नाचे आमिष देत तिचे लैंगिक शोषण केले. तसेच लग्नाला नकार दिला. याबाबत पीडिताने शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला किरण कुऱ्हाटकर रा. कळंब याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्रानुसार, सदर युवती शिक्षणानिमित्त वर्धेला यायची. दरम्यान, २०१० मध्ये तिचे किरणसोबत प्रेमसंबंध जुळले. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. यानंतर युवकाने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. यातच २०१२ मध्ये युवतीला गर्भधारणा झाली. किरणच्या म्हणण्यानुसार तिने गर्भपातही केला. तिने लग्नाची मागणी घालताच किरणने प्रारंभी होकार दिला. शिवाय लग्न न केल्यास आत्महत्या करण्याची धमकावणीही किरणने केली. त्यामुळे युवतीने त्याच्यासोबतच प्रेमसंबंध कायम ठेवले. यानंतरही युवकाने तिच्या लग्नाच्या मागणीला काही कारणास्तव लांबणीवर टाकले. युवतीकडून लग्नाची मागणी वाढल्याने किरणने एका मंदिरात तिच्याशी लपून लग्न केले. यातून त्यांच्यात पुन्हा शरीरसंबंध झाले. काही दिवसानंतर युवकाचे इतरत्र लग्न ठरताच किरणने या युवतीला टाळणे सुरू केले. तिने मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कुठलाही प्रतिसाद दिला नाही. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडिताने पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी किरण कुऱ्हाटकर याच्यावर कलम ३७६, ३१२, ५०६, ४९२, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Sexual harassment of the victim by a police employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.