शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

आचारसंहितेमुळे अडकला सात कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 10:20 PM

ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर वर्धा न.प.च्या प्रशासकीय इमारतीच्या कामाला सुरूवात करण्यात आली. असे असले तरी सध्या हे काम अपुऱ्या निधी अभावी प्रभावित झाले आहे. विशेष म्हणजे शासनाकडून ७ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वळता करण्यात आला आहे; पण आचारसंहितेमुळे तो पालिकेकडे वळता करण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देन.प.च्या नवीन इमारत निर्मितीवर परिणाम : इमारतीत सौर पॅनल आणि वॉटर हार्वेस्टिंगला स्थान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर वर्धा न.प.च्या प्रशासकीय इमारतीच्या कामाला सुरूवात करण्यात आली. असे असले तरी सध्या हे काम अपुऱ्या निधी अभावी प्रभावित झाले आहे. विशेष म्हणजे शासनाकडून ७ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वळता करण्यात आला आहे; पण आचारसंहितेमुळे तो पालिकेकडे वळता करण्यात आलेला नाही. त्यामुळे याचा परिणाम सध्या सुरू असलेल्या कामावर होत असल्याचे दिसून येत आहे.तत्कालीन नगराध्यक्ष सुनीता इथापे यांच्या कार्यकाळात वर्धा नगर परिषदेची जुनी इमारत तोडून त्याच जागेवर पालिकेची सुसज्य नवीन इमारत तयार करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, कंत्राटदार व पालिका प्रशासन यांच्यातील वाद न्यायालयापर्यंत पोहोचल्याने या कामाला थांबा मिळाला. त्यानंतर नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या सुरूवातीच्या अध्यक्षपदाच्या आठ महिन्यांच्या काळात पुन्हा हा विषय चर्चीला गेला. शिवाय पालिकेची नवीन इमारत सिव्हील लाईन भागात तयार करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर राज्यात काँगेस-राकाँचे सरकार असताना पालिकेच्या नवीन इमारतीसाठी वर्धा नगरपालिका प्रशासनाला तीन टप्प्यात २.४० कोटींचा निधी प्राप्त झाला. हा निधी प्राप्त व्हावा यासाठी तत्कालीन भाजपाचे नेते विनोद तावडे यांचे विशेष सहकार्य वर्धा न.प.च्या लोकप्रतिनिधींना लाभले. त्यानंतर ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते वर्धा न.प.च्या नवीन प्रशासकीय इमारतीचा श्रीगणेशा करण्यात आला. तेव्हापासून हे काम युद्धपातळीवरच पूर्ण करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले होते. सध्या स्थितीत नवीन इमारतीचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. परंतु, लोकसभेची आचारसंहिता लागल्यानंतर जिल्हा प्रशासनाला शासनाकडून प्राप्त झालेला निधी पालिकेकडे वळता करण्यात आलेला नाही.नवीन इमारत ठरेल ‘ग्रीन बिल्डिंग’वर्धा न.प.च्या जी-प्लस १ असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीत वॉटर हार्वेस्टिंग, फायर आॅडीट, सोलस पॅनल आदी विषय राहणार आहेत. एखाद्यावेळी आग लागल्यास फायर आॅडीट तर पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करण्यासाठी वॉटर हार्वेस्टिंग फायद्याचे ठरणार आहे. इतकेच नव्हे तर या इमारतीत सोलर पॅनल बसविण्यात येणार असल्याने येथील अर्धेअधीक कामकाज सौर उर्जेवर पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे न.प.ची ही नवीन इमारत ‘ग्रीन बिल्डींग’च ठरणार आहे.दुसऱ्या माळ्यावर रेस्ट हाऊस अन् कॅन्टीन विचाराधीन९.७० कोटींचा निधी खर्च करून तयार होत असलेल्या न.प.च्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर ९० लाख रुपये खर्चून रेस्ट हाऊस व कॅन्टीन तयार करण्याचे तेथील लोकप्रतिनिधींच्या विचाराधीन आहे. त्या अनुषंगाने रेखाचित्रही तयार करण्यात आले आहेत.शासनाकडून आलेला नवीन इमारतीसाठीचा सात कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडून आचारसंहितेमुळे वर्धा न.प.कडे वळता करण्यात आलेला नाही. या निधीची पालिका प्रशासनाला प्रतीक्षा आहे. सध्या नवीन इमारतीचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. ही इमारत ग्रीन बिल्डींग ठरणार आहे.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका