शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
3
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
4
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
5
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
6
Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच
7
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
8
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम
9
"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग
10
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
11
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
12
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
13
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
14
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
15
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
16
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
17
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
18
जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप
19
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
20
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे

सेवाग्राम रुग्णालयाला मिळाली कोविड चाचणीची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था यांनी १६ मार्चला कोरोना चाचणीची परवानगी मिळण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव पाठवला होता. त्याअनुषंगाने भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेच्या संचालक आणि नागपूर एम्सच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापक यांनी सेवाग्राम महाविद्यालयातील आवश्यक सुविधांची ऑनलाईन तपासणी केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : नागपूरला स्वॅब पाठविण्याची गरज नाही, झटपट मिळेल अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोना चाचणी प्रयोगशाळेची संख्या वाढविण्यात येत आहे. विदर्भात नागपूर, अकोलानंतर आता वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेला कोरोना चाचणीची परवानगी नागपूर येथील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमार्फत मिळाली आहे. यामुळे वर्धा जिल्ह्यातील सर्व कोरोना चाचणी येथेच करता येणार असून अहवालही झटपट मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली आहे. एकूणच ही वर्धा जिल्ह्यासाठी आनंदाची वार्ता आहे.सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था यांनी १६ मार्चला कोरोना चाचणीची परवानगी मिळण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव पाठवला होता. त्याअनुषंगाने भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेच्या संचालक आणि नागपूर एम्सच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापक यांनी सेवाग्राम महाविद्यालयातील आवश्यक सुविधांची ऑनलाईन तपासणी केली. चाचणीसाठी मान्यताप्राप्त उपकरणे, आवश्यक कागदपत्रे, भौतिक सुविधा, प्रशिक्षित डॉक्टर, कर्मचारी वर्ग याच्या तापसणीसोबतच त्यांना चाचणीसाठी स्त्राव नमुना पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या मानांकणाप्रमाणे १०० टक्के जुळल्यानंतर सेवाग्राम आयुर्विज्ञान संस्था कोरोना चाचणी करण्यासाठी योग्य असल्याचा अहवाल दिला. आज महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता नितीन गंगणे यांना नागपूर एम्सकडून कोरोना चाचणीसाठी परवानगी मिळाल्याचे पत्र प्राप्त होताच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवले.‘एम्स’च्या मार्गदर्शनात होणार चाचणीआयुर्विज्ञान संस्थेतील एक सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि तीन तंत्रज्ज्ञ यांचे ‘एम्स’ येथे चाचणीसंदर्भात प्रशिक्षण झाले आहे. महाविद्यालयात पूर्वीच बीएसएल-३ प्रयोगशाळा आहे. पूर्वी ही प्रयोगशाळा क्षयरोग कल्चर चाचणीसाठी वापरली जात होती. आता ती कोरोना चाचणी प्रयोगशाळेत रूपांतरित केली आहे. प्रयोगशाळेत उणे २० आणि ८० तापमानावर यासंदर्भातील टेस्टिंग एजंट ठेवण्याची सुविधा आहे. कोरोना चाचणी नागपूर एम्सच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. यासाठी टेस्टिंग किट भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेमार्फत पुरविण्यात येणार आहे, असे नितीन गंगणे यांनी सांगितले.तपासणीची सुविधा वर्धेतच मिळाल्याने मोठ्या प्रमाणात सर्वेक्षणाचे कार्य करता येईल. जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात फिव्हर क्लिनिकची सुविधा केली आहे. तेथे येणाºया तापाच्या रुग्णांचे स्त्राव आता टेस्टिंगसाठी पाठवता येतील. कुणी संशयित वाटत असेल तर त्याची चाचणी वर्धेतच होणार आहे. शिवाय लवकर अहवाल मिळत उपचार करणे सोयीचे होणार आहे. वर्धा जिल्ह्याला या परवानगीमुळे फायदा होणार आहे.- विवेक भिमनवार,जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी