वरिष्ठ गटात राहुल तर ज्युनिअर गटात संस्कृती व आर्या प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 10:04 PM2018-01-09T22:04:28+5:302018-01-09T22:05:05+5:30

वर्धा कला महोत्सव समिती व दत्ता मेघे फाऊंडेशन द्वारा आयोजित वर्धा कला महोत्सवात राज्यस्तरीय बाल नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

In the senior group, Rahul is in the junior category and culture first and Aya first | वरिष्ठ गटात राहुल तर ज्युनिअर गटात संस्कृती व आर्या प्रथम

वरिष्ठ गटात राहुल तर ज्युनिअर गटात संस्कृती व आर्या प्रथम

Next
ठळक मुद्देकला महोत्सवात राज्यस्तरीय बाल नृत्य स्पर्धा : ज्युनिअर गटात ६५, सिनिअर गटात २२ स्पर्धकांची निवड

आॅनलाईन लोकमत
वर्धा : वर्धा कला महोत्सव समिती व दत्ता मेघे फाऊंडेशन द्वारा आयोजित वर्धा कला महोत्सवात राज्यस्तरीय बाल नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्युनिअर गटातील एकल नृत्य प्रकारात संस्कृती वाकडे तर वेस्टर्न गटात आर्या गोतमारे हिने तसेच वरिष्ठ गटातील प्रथम बक्षीस राहूल उईके याने पटकाविले. समारोपीय कार्यक्रमात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजय वरटकर होते. प्रमुख अतिथी म्हणून संदीप चिचाटे, एकता कृती समितीचे अध्यक्ष किरण पट्टेवार, सचिव विलास ढोकणे, मनिषा भेंडे, रोशन माथनकर, प्रियंका मोहोड, अजंली नरांजे, यशश्री फटींगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. वरिष्ठ गटात राहुल उईके प्रथम, फाल्गुनी भानारकर द्वितीय तर तृतीय बक्षीस सार्थक लांडगे यांने पटकाविले. तर आस्था वांढरे आणि घनश्याम गुंडेवार यांना प्रोत्साहन पोरितोषिक प्रदान करण्यात आले. स्पर्धेतील ज्युनिअर गटात ६५ विद्यार्थ्यांची निवड झाली तर सिनीयर गटात २२ स्पर्धकांनी निवड करण्यात आली. ज्युनिअर गटाचे द्वितीय बक्षीस रागिनी ठाकरे, तृतीय सक्षम फटींगे याने पटकाविले. प्रोत्साहन पुरस्कार पुर्वशी बिसेन, राशी गजभिये, श्रेया मोटघरे यांना देण्यात आला. कार्यक्रमाला वृषभ काळबांडे, विक्की सोनटक्के, विजय बाभुळकर, सचिन डंभारे, अतुल झाडे, विनोद ताकसांडे, नरेद्र लोणकर, गौरव ओंकार, अजय झाडे, पवन राऊत, रसिक जोमदे आदींनी सहकार्य केले.
चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
वर्धा कला महोत्सव व दत्ता मेघे फाऊंडेशन वर्धा आयोजित वर्धा कला महोत्सव विदर्भ मुख्याध्यापक संघ व हेल्पींग हार्टेस चॅरिटेबल ट्रस्ट वर्धा यांनी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेतली. ही स्पर्धा तीन वयोगट घेण्यात आली होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सतीश जगताप, माजी शिक्षण अधिकारी तथा जि.प. सदस्य धनराज तेलंग, बाळसराफ, हेल्पींग हार्टेस चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोनाली श्रावणे, शारदा कला व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा उषा फाले, वर्धा कलामहोत्सव समितीचे आयोजक संदीप चिचाटे, अभिजीत श्रावणे, पवन तिजारे, आशीष तिवारी, आशीष पोहाणे संजय तिगावकर यांची उपस्थिती होती. सदर चित्रकला स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन आशीष पोहाणे यांनी केले. कार्यक्रमाला निता जानी, योगिता मानकर, रोहिणी पाटील, विजया अड्याळकर, सारा तराळे, प्रिती अहिरराव, ज्युली भुरे, धनश्री भुरे, मंगला धोटे आदींची उपस्थिती होती.

Web Title: In the senior group, Rahul is in the junior category and culture first and Aya first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.