लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : नगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ताधारकांनी कर थकविला होता. वारंवार सूचना देऊनही कर भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने पालिकेच्यावतीने कारवाईचा बडगा उगारला. कर वसुली पथकाने गाळ्यांना सील लाऊन चार लाखांची कर वसुली केली. पालिकेच्या या धडक कारवाईमुळे आता कर थकविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.शहरातील नगरपालिकेच्या मालकीच्या शॉपिंग सेंटरमधील काही गाळेधारकांनी पालिकेचा कर थकविला होता. कर भरण्यासंदर्भात कळविल्यानंतरही कराचा भरणा करण्यास असमर्थता दर्शविली. शेवटी कर वसुली पथकाने धडक मोहीम राबवून कर थकविणाºया मालमत्ताधारकांच्या गाळ्याला सील लावले. त्यामुळे लगेचच कराचा भरणा करण्यात आला.एकाच दिवशीच्या कारवाईत चार लाखाचा कर वसुल केला. गाळेधारकांनी ठरलेल्या वेळेत पैसे न भरल्यास यापुढे सुद्धा ही कारवाई सुरू राहणार असल्याने नगरपालिकेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी यावेळी सांगितले. या कारवाईत नगरपालिकेचे अधीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, कर विभाग प्रमुख देवेंद्र निकोसे व ज्ञानेश्वर दहिफळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांना सेवा पुरविण्यासाठी नियमित कर भरणे आवश्यक आहे. त्यातून पालिकेच्या उत्पन्न भर पडले. म्हणून नियमित कर भरण्याचे आवाहन करण्यात आले.
मालमत्ताधारकांच्या गाळ्यांना लावले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST
शहरातील नगरपालिकेच्या मालकीच्या शॉपिंग सेंटरमधील काही गाळेधारकांनी पालिकेचा कर थकविला होता. कर भरण्यासंदर्भात कळविल्यानंतरही कराचा भरणा करण्यास असमर्थता दर्शविली. शेवटी कर वसुली पथकाने धडक मोहीम राबवून कर थकविणाºया मालमत्ताधारकांच्या गाळ्याला सील लावले. त्यामुळे लगेचच कराचा भरणा करण्यात आला.
मालमत्ताधारकांच्या गाळ्यांना लावले सील
ठळक मुद्देपालिकेची कारवाई : चार लाखांची करवसुली