शाळांनी राबविला मतदार जनजागृती सप्ताह
By Admin | Updated: October 14, 2014 23:23 IST2014-10-14T23:23:28+5:302014-10-14T23:23:28+5:30
स्थानिक आर.के. कनिष्ठ महाविद्यालयात विधानसभा निवडणुकीबाबत मतदार जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. मतदार जागृती अंतर्गत प्राचार्य विजय मामनकर, उपप्राचार्य नुरसिंग

शाळांनी राबविला मतदार जनजागृती सप्ताह
पुलगाव : स्थानिक आर.के. कनिष्ठ महाविद्यालयात विधानसभा निवडणुकीबाबत मतदार जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. मतदार जागृती अंतर्गत प्राचार्य विजय मामनकर, उपप्राचार्य नुरसिंग जाधव यांनी विद्यार्थी व शिक्षकांना सामूहिक शपथ दिली.
यानंतर संस्थेच्यावतीने नाचणगाव परिसरात असंख्य विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली मतदार जनजागृती रॅली काढून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. मतदार जनजागृती संबंधित विषयावर कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर निबंध व चित्रकला स्पर्धा, माध्यमिक व पूर्व माध्यमिक विद्यार्थ्यांकरिता पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याच संदर्भात शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, शाळा समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश केजडीवाल, ज्येष्ठ विश्वस्त मोहन अग्रवाल, के.आर. बजाज, नायब तहसीलदार उषा येटे, इम्रान राही, प्राचार्य मामनकर, उपप्राचार्य जाधव, उपमुख्याध्यापिका प्रमिला नकाशे यांच्यास उपस्थितीत विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले़ शिवाय याबाबत परिसरातील मतदारांत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)