स्कूलबस थांबवून चिमुकल्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 06:00 AM2019-11-16T06:00:00+5:302019-11-16T06:00:12+5:30

वासुदेव लढी रा. साखरा, असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याची मुलगी व अमन रामकृष्ण आदमने (१०) हे दोघेही वासी येथील ज्ञानज्योती इंग्लिश स्कूलमध्ये चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहेत. दोघेही एकाच स्कूलबसने शाळेत जातात. गुरुवारी बालकदिनी वासुदेव लढी याने कोरा येथील चौकात येऊन स्कूलबस थांबविली. बसमध्ये असलेल्या अमनला माझ्या मुलीली सिटवर का बसू देत नाही, अशी विचारणा करीत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर आपल्या मुलीला बसमधून उतरवून तेथून निघून गेला.

The school bus stopped and hit the child | स्कूलबस थांबवून चिमुकल्याला मारहाण

स्कूलबस थांबवून चिमुकल्याला मारहाण

Next
ठळक मुद्देपोलिसांत तक्रार : शाळेतील विद्यार्थिनीच्या वडिलांचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरा : माझ्या मुलीला स्कूलबसमध्ये सिटवर का बसू देत नाही, या कारणावरून वाद घालत विद्यार्र्थिनीच्या वडिलांनी दहा वर्षीय चिमुकल्याला बेदम मारहाण केली. ही घटना बालकदिनी दुपारी ११ वाजताच्या सुमारास कोरा येथील चौकात घडली. याप्रकरणी स्कूलबस चालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
वासुदेव लढी रा. साखरा, असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याची मुलगी व अमन रामकृष्ण आदमने (१०) हे दोघेही वासी येथील ज्ञानज्योती इंग्लिश स्कूलमध्ये चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहेत. दोघेही एकाच स्कूलबसने शाळेत जातात. गुरुवारी बालकदिनी वासुदेव लढी याने कोरा येथील चौकात येऊन स्कूलबस थांबविली. बसमध्ये असलेल्या अमनला माझ्या मुलीली सिटवर का बसू देत नाही, अशी विचारणा करीत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर आपल्या मुलीला बसमधून उतरवून तेथून निघून गेला.
या घटनेची माहिती मिळताच अमनच्या आई-वडिलांनी अमनला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. तेथे अमनवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी स्कूलबस चालक राजेंद्र राऊत यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास ठाणेदार महेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक निंबाळकर करीत आहेत. घटनेमुळे गावात संताप व्यक्त होत आहे.

Web Title: The school bus stopped and hit the child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा