नागपूर-चंद्रपूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:28 IST2018-03-21T11:28:16+5:302018-03-21T11:28:28+5:30

नागपूर चंद्रपूर मार्गावर डोंगरगाव शिवारात २० मार्चला रात्री १ वाजता च्या सुमारात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्या वाघाचे एक ते दीड वर्षाचे पिल्लू जागीच ठार झाले.

A scare of unknown vehicles on Nagpur-Chandrapur road | नागपूर-चंद्रपूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

नागपूर-चंद्रपूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

ठळक मुद्देदीड वर्षे वयाचे पिल्लू

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: नागपूर चंद्रपूर मार्गावर डोंगरगाव शिवारात २० मार्चला रात्री १ वाजता च्या सुमारात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्या वाघाचे एक ते दीड वर्षाचे पिल्लू जागीच ठार झाले.
नागपूर चंद्रपूर मार्गावर असलेल्या पोथरा नदीच्या कडेला असलेल्या झुडपामध्ये थंड वातावरण असल्याने ह्या ठिकानी वन्यप्राण्याचे वास्तव्य असते. ह्या ठिकाणावरु न रात्रीच्या वेळी वन्यप्राणी जाणे येणे करीत असतात. हे पिल्लूदेखील या ठिकाणाहून रस्ता पार करत असताना अज्ञात वाहनाखाली आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही बाब रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी समुद्रपूर येथील वनपरिक्षेत्र अदिकारी बी.डी. बाभळे यांना त्याची माहिती दिली.
त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून बिबटचा मृतदेह समुद्रपूर येथे आणला व त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक सुहास बडेकर, क्षेत्र सहाय्यक बी.एस. राऊत, विजय आडकिने आदी उपस्थित होते.
 

Web Title: A scare of unknown vehicles on Nagpur-Chandrapur road

टॅग्स :Accidentअपघात