शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाशी लढण्यास सावंगी रुग्णालय सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

कोरोना हे देशावर आलेले संकट असले तरी आपण सारे आरोग्य क्षेत्रातले लढवय्ये असल्यामुळे भयभीत होण्याचे कारण नाही. आरोग्यावरील या संकटाशी लढण्यास सावंगी रुग्णालयाची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून डॉक्टरांपासून नर्स आणि वॉडर् बॉयपर्यंत सर्वांनी २४ तास कार्य तत्पर असावे, असे निर्देश दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे व्यवस्थापन मंडळ सदस्य सागर मेघे यांनी आपत्ती निवारणाचा आढावा घेताना दिले.

ठळक मुद्देसागर मेघे : रुग्णांची स्वतंत्र तपासणी व भरती व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना हे देशावर आलेले संकट असले तरी आपण सारे आरोग्य क्षेत्रातले लढवय्ये असल्यामुळे भयभीत होण्याचे कारण नाही. आरोग्यावरील या संकटाशी लढण्यास सावंगी रुग्णालयाची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून डॉक्टरांपासून नर्स आणि वॉडर् बॉयपर्यंत सर्वांनी २४ तास कार्य तत्पर असावे, असे निर्देश दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे व्यवस्थापन मंडळ सदस्य सागर मेघे यांनी आपत्ती निवारणाचा आढावा घेताना दिले.शासनाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करीत रुग्णालयात कार्यरत प्रत्येक कर्मचाऱ्याला आरोग्य सेवेतील योद्ध्याची भूमिका बजावायची आहे. गरज भासल्यास मेघे समूहातील अन्य कर्मचारी वृंदालाही या आणिबाणीच्या काळात सावंगी रुग्णालयात नियुक्त करण्यात येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत सामान्य रुग्ण तसेच कोरोनाबाबत संशयित किंवा बाधित रुग्णांची गैरसोय होणार नाही आणि हा संसर्ग वाढणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली जाईल, असेही सागर मेघे म्हणाले. सध्या सावंगी मेघे रुग्णालयात २४ तास सेवा देणारी २०० कर्मचाऱ्यांची स्वतंत्र चमू तीन पाळ्यांमध्ये कार्यरत करण्यात आली असून गरज भासल्यास त्यात वाढ करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. वैद्यकीय सुविधेसाठी सर्वसामान्य रुग्ण आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात तर विशेष रूग्ण शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी केंद्रात ठेवण्याची स्वतंत्र यंत्रणाही उभारण्यात आली आहे. संशयित रुग्णांसाठी कृत्रिम श्वसनयंत्रणा असलेला ३० रुग्णखाटांचा स्वतंत्र विभाग तर बाधित रुग्णांसाठी अत्याधुनिक सेवा देणारे पाच बेड राखून ठेवण्यात आले आहेत. अन्य कारणाने आवश्यकता असलेल्या सामान्य व संशयित रुग्णांसाठी वेगवेगळी शस्त्रक्रियागृहेही कार्यान्वित करण्यात आली आहेत. रुग्णालयात येणाºया प्रत्येक रुग्णाची पूर्वतपासणी केली जात असून त्यासाठी स्क्रिनिंग काऊंटर उभारण्यात आले आहेत. याशिवाय, ठिकठिकाणी हॅण्डवॉश सुविधेसोबतच मास्क, सॅनेटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रुग्णांव्दारे आलेला कोणताही फोन टाळू नका, उलट त्यांना दिलासा देत आरोग्यसेवा उपलब्ध करून द्या, असे निर्देशही यावेळी डॉक्टरांना देण्यात आले. यासोबतच वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, भौतिकोपचार, नर्सिंग व अन्य महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना सुट्ट्या देण्यात आल्या असून परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या विद्यार्थ्यांसाठी मोबाईल आणि लॅपटॉपवर आॅनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तर कर्मचारी वर्गासाठी कोरोना आपत्ती व रुग्ण व्यवस्थापनाच्या दृष्टीने विशेष प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. रुग्णबस सध्या गर्दीतूून होणारा संसर्ग टाळण्यासाठी बंद करण्यात आल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या