रिधोऱ्याच्या सरपंच, उपसरपंचावर अविश्वास
By Admin | Updated: August 7, 2015 02:02 IST2015-08-07T02:02:32+5:302015-08-07T02:02:32+5:30
रिधोरा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचावर बुधवारी झालेल्या सभेत अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.

रिधोऱ्याच्या सरपंच, उपसरपंचावर अविश्वास
ठराव मंजूर : एक सदस्य तटस्थ
सेलू : रिधोरा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचावर बुधवारी झालेल्या सभेत अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. ठरावाच्या बाजूने ग्रा.पं. च्या सहा सदस्यांनी मतदान केले तर विरोधात दोन सदस्यांनी मतदान केले. एका सदस्याने तटस्थ भूमिका घेतली.
सरपंच आणि उपसरपंच सदस्यांना विश्वासात घेऊन कामे करीत नाहीत, असे कारण पूढे करीत रिधोरा ग्रामपंचायतीच्या सरपंच छाया अरुण कोहळे आणि उपसरपंच ज्ञानेश्वर इवनाथे यांच्या विरोधात शनिवारी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. त्या ठरावावर चर्चा करण्याकरिता बुधवारी ग्रा.पं. सभागृहामध्ये सभा घेण्यात आली. यात सुरेश चावरे, विठ्ठल आतराम, अरविंद सिराम, माया कोराम, निलीमा उईके, नंदा डोंगरे या सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. अर्चना सडमाके या ग्रा.पं. सदस्य तटस्थ राहिल्या.
सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. रवींद्र होळी होते. सभेला सदस्यांसह नायब तहसीलदार अजय झिले, ग्रामसेवक डोंगरे, संजय नेहारे, आकाश साखरकर आदी उपस्थित होते. अविश्वास ठराव मंजूर झालेल्या सरपंच आणि उपसरपंचांना पदमुक्तीचे आदेश देण्यात आलेत. या अविश्वासामुळे सध्या रिधोरा ग्रा.पं. ची दोन्ही पदे रिक्त झाली आहेत.(शहर प्रतिनिधी)