एकाच घाटावर होणार विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 09:34 PM2018-09-19T21:34:01+5:302018-09-19T21:34:26+5:30

लवकरच सार्वजनिक, घरगुती गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात होणार आहे. दरवर्षी पवनारला धाम नदीत हजारो बाप्पांचे विसर्जन होत असते. शहरामध्ये पर्यावरण पुरक विसर्जनाची सोय शासन पालिका प्रशासन व सामाजिक संस्थेद्वारे केली जात असल्यामुळे गतवर्षीपासून घरगुती गणपतीच्या विसर्जनाची संख्या काही प्रमाणात घटली असली तरी नदीचे आकर्षण व हौस मौजेसह विसर्जन करण्यासाठी अनेकांची पवनारला प्रथम पसंती असते.

On the same ghost will be immersed | एकाच घाटावर होणार विसर्जन

एकाच घाटावर होणार विसर्जन

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस यंत्रणा सज्ज : मंडळाच्या सदस्यांना नदीत उतरण्यास मनाई

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : लवकरच सार्वजनिक, घरगुती गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात होणार आहे. दरवर्षी पवनारला धाम नदीत हजारो बाप्पांचे विसर्जन होत असते. शहरामध्ये पर्यावरण पुरक विसर्जनाची सोय शासन पालिका प्रशासन व सामाजिक संस्थेद्वारे केली जात असल्यामुळे गतवर्षीपासून घरगुती गणपतीच्या विसर्जनाची संख्या काही प्रमाणात घटली असली तरी नदीचे आकर्षण व हौस मौजेसह विसर्जन करण्यासाठी अनेकांची पवनारला प्रथम पसंती असते.
सेवाग्राम-पवनार विकास आराखड्यांतर्गत धाम नदी तिरावर पर्यटन विकासाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे यावर्षी नंदीघाट परिसर हा विसर्जनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. दरवर्षी या घाटावर घरगुती गणपती विसर्जन व्हायचे तर छत्री परिसरात सार्वजनिक गणपतीचे विसर्जन केल्या जात होते. परंतु नंदीघाट पर्यटनाच्या कामामुळे बंद असल्याने सर्व बाप्पांचे विसर्जन छत्री घाटावरच होणार असल्याचे सेवाग्राम पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय बोढे यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे सोळा सार्वजनिक गणपती व सेवाग्राम परिसरातील सहा सार्वजनिक गणपती धाम तिरावर विसर्जनासाठी येणार आहेत. वर्धा परिसरातील माहिती अजून मिळाली नसल्याने त्यांनी सांगितले बंदोबस्ताची चोख व्यवस्था करण्यात आली असून त्याकरिता १० पोलीस अधिकारी व ५० पोलीस होमगार्ड तैनात करण्यात येणार आहे. त्याकरिता एकेरी वाहतुक राहणार असून आश्रमकडे जाणाऱ्या लहान पुलावरून वाहने येतील व मोठ्या पुलावरून बाहेर निघण्याचा मार्ग असणार आहे. अप्रिय घटना टाळण्यासाठी पवनारातील पट्टीचे पोहणाºयांच्या लाईफ गार्ड म्हणून वापर करण्यात येणार आहे. त्यांना लाईफ जॅकेट व टी शर्ट पुरविण्यात येणार आहे. मचान उभारून त्यावरून दुर्बिणीद्वारे पाहणी करण्याची यंत्रणा सुध्दा उभारण्यात येणार आहे.
कुंडाचे बांधकाम अर्धवट स्थितीत
पर्यटन विकासाच्या कामामध्येच पर्यावरणपूरक गणेश विसर्जन कुंड उभारण्यात येत असला तरी त्याचे काम अर्धवट असल्यामुळे यावर्षी त्याचा उपयोग होणार नसल्याचे दिसून येते. पुढत्या वर्षी मात्र त्याच कुंडात विसर्जन करण्यात येईल.

पोलीस यंत्रणा सज्ज असून विसर्जनाच्या वेळेस कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून दक्ष राहणार आहे., ग्रा.पं. प्रशासनाकडून छत्री परिसरातील विसर्जन स्थळावरील कुंडातील गाळ साफ करून घेतला असून कुठल्याही मंडळाच्या कार्यकर्त्याला विसर्जनासाठी नदीत उतरून दिले जाणार नाही. पोलिस मित्र व नियुक्त केलेले पट्टीचे पोहणारे विसर्जनाचे कार्य पार पाडतील.
- संजय बोढे, पोलीस निरीक्षक, सेवाग्राम.

Web Title: On the same ghost will be immersed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.