पंचधारा धरणाची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:32+5:30

सांडव्यावरून वाहनारे पाणी पर्यटकांना भुरळच घालत आहे. अशातच अनेक जण सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना न बाळगता थेट पाण्याकडे जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. रिधोरा येथील पंचधारा धरणावर प्रत्येक दिवशी सध्या शेकडो पर्यटक भेट देत आहेत. रविवारीतर पर्यटकांचा मेळाच या ठिकाणी भरतो.

The safety of the Panchadhara Dam in the wind | पंचधारा धरणाची सुरक्षा वाऱ्यावर

पंचधारा धरणाची सुरक्षा वाऱ्यावर

ठळक मुद्देपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : तातडीने योग्य पाऊल उचलण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
झडशी : नजीकच्या रिधोरा येथील पंचधारा धरणाची सुरक्षा सध्या वाºयावर असल्याचे दिसून येत आहे. हा परिसर जंगलव्याप्त आणि निसर्गरम्य असल्याने सध्या येथे पर्यटकही पावसासह धरणाच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. परंतु, पर्यटकांची मनमर्जी सध्या एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारी ठरत असून त्याकडे पाटबंधारे विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
यंदाच्या वर्षी दमदार पाऊस झाल्याने रिधोरा येथील पंचधारा धरण १०० टक्के भरले आहे. सध्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. सांडव्यावरून वाहनारे पाणी पर्यटकांना भुरळच घालत आहे. अशातच अनेक जण सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना न बाळगता थेट पाण्याकडे जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. रिधोरा येथील पंचधारा धरणावर प्रत्येक दिवशी सध्या शेकडो पर्यटक भेट देत आहेत. रविवारीतर पर्यटकांचा मेळाच या ठिकाणी भरतो. निसर्गरम्य वातावरण बघण्यासाठी येणारे अनेक पर्यटक सध्या मोठा धोका पत्कारून धरणाच्या पाण्यात पोहताना दिसतात. कुणीही धरणाच्या पाण्यात उतरू नये असे पाटबंधारे विभागाच्यावतीने वेळोवेळी सांगितल्या जात असले तरी येथे त्याकडे दुर्लक्षच करण्यात धन्यता मानली जात आहे. इतकेच नव्हे तर या धरणावर धरणाच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात तरुण मंडळीही येत आहेत. त्यांच्याकडून पाण्यात उतरुन सेल्फी काढण्याचेही प्रकार येथे होत आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता या ठिकाणी प्रभावी उपाय योजना करण्याची मागणी आहे.
 

Web Title: The safety of the Panchadhara Dam in the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण