शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांनी केली कपाशीची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST

देवळी व परिसरात रानडुक्कर मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. तेलरांधे यांची ५० ते ६० बोंडे असलेली तसेच माणुसभर उंच वाढलेली पºहाटी वन्यप्राण्यांनी भुईसपाट केली.

ठळक मुद्देशेतकऱ्याला दीड लाखाचा फटका । वनविभागाकडे केली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यातील पडेगाव पांदण रस्त्यावरील वामनराव तेलरांधे यांच्या शेतात रानडुक्करांच्या कळपाने हैदोस घालून दोन एकरातील कपासीचे पीक नष्ट केले. त्यामुळे शेतकरी तेलरांधे यांचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबतची तक्रार वनविभागाकडे केल्यानंतर वनरक्षक स्विटी दांडवे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे.देवळी व परिसरात रानडुक्कर मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. तेलरांधे यांची ५० ते ६० बोंडे असलेली तसेच माणुसभर उंच वाढलेली पºहाटी वन्यप्राण्यांनी भुईसपाट केली. हा प्रकार नेहमीचाच झाल्याने शेतकºयांमध्ये वन्यप्राण्यांबाबत रोष वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी याच शिवारातील विठ्ठल नारायण लाडेकर व सरस्वता वामन तेलरांधे यांच्या शेतातील कपाशीच्या पिकाचे रानडुक्करांनी नुकसान केले.या शिवाराला लागून पॉवर ग्रीडची सरंक्षण भिंत असून या भिंतीचे बाजूला लोकांच्या रहदारीसाठी म्हणून रस्ता निर्मितीसाठी जागा सोडण्यात आली. परंतु, या जागेवर रस्त्याचे बांधकाम न केल्याने हा परिसर झुडुपांनी व्यापला आहे. त्याच झुडुपांचा आडोसा सध्या वन्यप्राणी लपण्यासाठी घेत आहेत.विशेष म्हणजे या शिवाराचे आजूबाजूला लोखंडी टॉवरचे जंगल उभे राहिल्याने वानरांचाही नाहक त्रास या भागातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. हे सर्व वन्यप्राणी शेतात येवून शेतमालाचे नुकसान करीत आहेत. वनविभागाने शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन सदर वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा तसेच नुकसानग्रस्तांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकºयांची आहे.

टॅग्स :agricultureशेती