रस्त्यालगतची लाकडे ठरताहेत जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:48 AM2019-01-09T00:48:07+5:302019-01-09T00:49:43+5:30

वर्धा-वायगाव-हिंगणघाट रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. बांधकामात ही झाडे अडसर ठरत असल्याने महिनाभरापूर्वी कत्तल करण्यात आली. ही तोडलेली झाडे वाहनचालक, पादचाऱ्यांकरिता जीवघेणी ठरताना दिसून येत आहे.

Road to wood | रस्त्यालगतची लाकडे ठरताहेत जीवघेणी

रस्त्यालगतची लाकडे ठरताहेत जीवघेणी

Next
ठळक मुद्देवर्धा-वायगाव, हिंगणघाट मार्ग : अपघातांची मालिका सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (निपाणी) : वर्धा-वायगाव-हिंगणघाट रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. बांधकामात ही झाडे अडसर ठरत असल्याने महिनाभरापूर्वी कत्तल करण्यात आली. ही तोडलेली झाडे वाहनचालक, पादचाऱ्यांकरिता जीवघेणी ठरताना दिसून येत आहे. मोठमोठी झाडे व त्यांच्या फांद्या रस्त्यावर आल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.
रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांमुळे परिसरातील शेतकºयांनासुद्धा आपल्या शेतात जाण्या येण्यास अडचण निर्माण झाली आहे. मागील कित्येक दिवसांपासून ही तोडलेली झाडे जशीच्या तशीच रस्त्याच्या कडेला पडून आहेत. ती तातडीने उचलून विल्हेवाट लावावी, अशी मागणी सेलू काटे येथील शेतकºयांसह प्रवाशांनी केली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास शेतातून येत असलेली बैलबंडी उलटली. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. रस्त्याच्या कडेला झाडांची खोडं आहे. ही खोडं त्या खड्ड्यांतून काढली, मात्र ते खड्डे जैसे थे ठेवले आहे. या खड्ड्यांमध्ये जनावरे आणि शेतकऱ्यांना अपघात होण्याचीही शक्यता बळावली आहे. याकडे संबंधित विभागाने व कंत्राटदाराने लक्ष देत तोडलेल्या झाडांची विल्हेवाट लावावी, अशी मागणी सेलू काटे येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना नाहीत
वर्धा-हिंगणघाट रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरू असून या कामाला गेल्या महिनाभरापासून प्रारंभ झाला आहे. या कामाकरिता रस्त्याची एक बाजू खोदून ठेवली आहे. काही ठिकाणी रिफ्लेक्टर लावले आहे तर काही ठिकाणीचे रिफ्लेक्टर बेपत्ता असल्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. या रिफ्लेक्टरमुळे रात्रीच्या सुमारास चालकाला अंदाज येतो, मात्र, ज्या ठिकाणी रिफ्लेक्टर नाही, त्या ठिकाणी चालकाला काहीच कळत नाही. यामुळे अपघात होऊ शकतो.

पुलावरील खड्ड्याने घेतला बळी
वर्धा-हिंगणघाट रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्ता रूंदीकरणासाठी पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. एका कडेने काम सुरू असल्याने दुसरी बाजू वाहनांकरिता सुरू आहे. ३१ डिसेंबर रोजी सेलूकाटे येथील एका युवकाला याच खड्ड्यामुळे आपली जीव गमवावा लागला. पुन्हा असा अपघात होऊ नये, याची दक्षता घेणे गरजेचे झाले आहे.

बांधकाम विभाग, कंत्राटदार कुंभकर्णी झोपेत
वर्धा-हिंगणघाट मार्गाच्या रूंदीकरणाच्या काम सुरू आहे. या कामामुळे दररोज किरकोळ व मोठे मोठे अपघात होत आहेत. असे असताना याकडे दुर्लक्ष आहे. बांधकाम विभाग, कंत्राटदार कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप सेलूकाटे येथील शेतकºयांनी केला आहे. एखादी मोठी घटना घडल्यानंतरच या विभागाला जाग येईल, असे ते बोलत आहेत.

Web Title: Road to wood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.