शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

शाळेत जाता यावे म्हणून वर्ध्यात विद्यार्थ्यांनी केले रस्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 4:05 PM

आजवर अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना वा अन्य संघटनांनी केलेली रास्ता रोको आंदोलने आपण पाहिली आहेत. मात्र आज, गुरुवारी वर्धा जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठाण मांडून केलेले रास्ता रोको आंदोलन हे बहुदा असे पहिलेच आंदोलन असावे.

ठळक मुद्देबस वेळेवर येत नसल्याने शिक्षणाचा खेळखंडोबाबसचा थांबा नसल्यानेही अडचण

आॅनलाईन लोकमतवर्धा: आजवर अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना वा अन्य संघटनांनी केलेली रास्ता रोको आंदोलने आपण पाहिली आहेत. मात्र आज, गुरुवारी वर्धा जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठाण मांडून केलेले रास्ता रोको आंदोलन हे बहुदा असे पहिलेच आंदोलन असावे. या आंदोलनामागचे कारण म्हणजे, गावखेड्यातून येणाऱ्या या विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहचता येत नाही किंवा काही विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात बसचा थांबा हवा आहे असे होते.तळेगाव आष्टी राज्य मार्गावर सुजातपूर, ममदापूर, शिरकुटनी या गावांवरून बस जाते मात्र ती या ठिकाणी थांबत नाही, काही ठिकाणी बस थांबते पण ती तिथे दररोज किमान अडीच ते तीन तास उशीरा येते या कारणांमुळे येथील शाळकरी विद्यार्थी त्रस्त झाले होते. कित्येकदा त्यांना शाळेत सुरू असलेल्या परीक्षेलाच मुकावे लागते. गुरुवारी सकाळी याच समस्येची पुनरावृत्ती झाली. मोर्शी आगाराची बस आली मात्र ती थांबली नाही. मग या चिमुकल्यांनी थेट लोकशाहीतील आंदोलनाचा मार्ग स्वीकारून गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास रस्त्यावरच ठाण मांडले व वाहतूक ठप्प केली. त्यांच्या आंदोलनाची माहिती कळताच गावकरीही त्यांच्या मदतीला धावले. या आंदोलनादरम्यान आर्वी आगाराची एक बस तेथे थांबली व त्यात काही विद्यार्थ्यांना जाता आले पण उर्वरित विद्यार्थी रस्त्यावरच बसून राहिले. मात्र त्यांच्या या आंदोलनाची प्रशासन वा कुठल्या राजकीय पक्षाने दखल घेतल्याचे दिसले नाही. यावेळी गावकऱ्यांनी परिवहन मंत्र् यांना निवेदन पाठविल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :educationशैक्षणिक