शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगासह जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST

५ मार्च २०१५ ला फिर्यादीचा पती कापूस भरण्यासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी पीडिता ही तिच्या मुलासोबत घरी होती. दरम्यान आरोपी राजू इंगळे याने पीडितेच्या घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केला. शिवाय जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने आरडा-ओरड केली. शिवाय दरम्यान पीडितेचा पती घरी आला. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून देवळी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देदंडही ठोठावला : अतिरिक्त सत्र न्यायाधीशांचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील जिल्हा न्यायाधीश २ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. मिश्रा यांनी आरोपी राजू विनायक इंगळे (३५) रा. कोल्हापूर शिंगारवाडी ता. देवळी यास विशेष प्रकरण क्र.१०/२०१५ शासनविरूद्ध राजू इंगळे मध्ये कलम ३५४ भादंवि नुसार १ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा तसेच कलम ५०६ अन्वये १ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तर अनुसुचित जाती जमाती कायद्यातून निर्दोषमुक्त केले आहे.प्राप्त माहितीनुसार, ५ मार्च २०१५ ला फिर्यादीचा पती कापूस भरण्यासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी पीडिता ही तिच्या मुलासोबत घरी होती. दरम्यान आरोपी राजू इंगळे याने पीडितेच्या घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केला. शिवाय जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने आरडा-ओरड केली. शिवाय दरम्यान पीडितेचा पती घरी आला. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून देवळी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजन पाली यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. पैरवी अधिकारी म्हणून एन. पी. सी. निलेश सडमाके व एन. पी. सी. समीर कडवे यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्या. आर. एम. मिश्रा यांनी आरोपीला वरिल शिक्षा ठोठावली. शासकीय बाजू अ‍ॅड. अमोल कोटंबकर यांनी मांडली.

टॅग्स :Courtन्यायालय