शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा संकल्प
By Admin | Updated: August 17, 2015 02:11 IST2015-08-17T02:11:04+5:302015-08-17T02:11:04+5:30
केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण, सौर ऊर्जा पंपाच्या माध्यमातून सिंचनाचा लाभ तसेच जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून ....

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा संकल्प
अनेकांचा सत्कार : मुख्य समारंभात जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते ध्वजारोहण
वर्धा : केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण, सौर ऊर्जा पंपाच्या माध्यमातून सिंचनाचा लाभ तसेच जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शेतीला संबंधीत सिंचनाचा लाभ अगदी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा संकल्प जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी स्वातंत्र्यदिनी सोडला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणावर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण नंतर ते बोलत होते. जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणारे उद्योजक, विविध शैक्षणिक उपक्रमात प्राविण्य मिळणारे विद्यार्थी तसेच वनसंवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तीचा त्यासोबतच सिंदी (रेल्वे) येथील पुरात वाहून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीवाची परवा न करता प्राण वाचविल्याबद्दल वैभव रामेश्वर घंगारे याला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मिणा, अपर जिल्हाधिकारी संजय भागवत उपस्थित होते. राज्यातील १४ जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनापासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरवठा तसेच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याच्या योजनेच्या प्रसिद्धी अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता शंकर कांबळे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी ध्वजारोहण करून सलामी दिली. त्यानंतर सशस्त्र पोलीस दलाची मानवंदना स्विकारली. या कार्यक्रमात लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत हिंगणघाट तालुक्यातील आजंती येथील आर.के. इंडस्ट्रीजला रोख १५ हजार शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देवून प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. तर वर्धा येथील प्रसून इंडस्ट्रीजला रोख रक्कम १० हजार, श्रीफळ आणि मानचिन्ह देवून द्वितीय पुरस्काराने गौरविण्यात आले. वनविभागातील सन २०१४-१५ या आर्थिक वर्षातील जिल्हास्तरावरील संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत खरांगणा आणि आष्टी वनपरिक्षेत्रातील अनुक्रमे बोरगाव व टुमनी यांना विभागून प्रथम पुरस्कार ५१ हजार व प्रमाणपत्र, तळेगाव वनपरिक्षेत्रातील इंदरमारी समितीस द्वितीय पुरस्कार ३१ हजार रुपये प्रमाणपत्र, तृतीय पुरस्कार खरांगणा व समुद्रपूर वनपरिक्षेत्रातील लादगड व दसोडा समितीस ११ हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन जिल्हाधिकारी यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यस्तरावरील गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करणाऱ्या सावंगीच्या स्कूल आॅफ स्कॉलर शाळेचे श्लोक राजेश इंगळे व ऋषी दिनेश असोपा यांनाही प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गौरविले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अजय येते व ज्योती भगत यांनी केले.(प्रतिनिधी)
सिंदी (रेल्वे) च्या युवकाचा सत्कार
सिंदी (रेल्वे) येथील पुरात वाहून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीवाची परवा न करता प्राण वाचविल्याबद्दल वैभव रामेश्वर घंगारे याला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कार देण्यात आले आहे.
वनविभागातील सन २०१४-१५ या आर्थिक वर्षातील जिल्हास्तरावरील संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत खरांगणा आणि आष्टी वनपरिक्षेत्रातील अनुक्रमे बोरगाव व टुमनी यांना विभागून प्रथम पुरस्कार ५१ हजार व प्रमाणपत्र, तळेगाव वनपरिक्षेत्रातील इंदरमारी समितीस द्वितीय पुरस्कार ३१ हजार रुपये प्रमाणपत्र, तृतीय पुरस्कार खरांगणा व समुद्रपूर वनपरिक्षेत्रातील लादगड व दसोडा समितीस ११ हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात आला.