शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

१९ जणांचा नेत्रदानाचा संकल्प

By admin | Updated: June 12, 2016 01:51 IST

‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ ही म्हण सार्थ ठरवित वर्धेतील १९ जणांनी मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प केला.

दृष्टीदान दिन : सामान्य रुग्णालयात कार्यक्रमवर्धा : ‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ ही म्हण सार्थ ठरवित वर्धेतील १९ जणांनी मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प केला. जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित दृष्टीदान दिन कार्यक्रमात त्यांनी तसे इच्छापत्र भरून दिले. या कार्यक्रमात डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. एम. बी. सुटे, डॉ. रंजना वाढीवे, सुमेध पखाले, प्रियंका वंडकार, पूजा राठोड, मनीषा बावणे, मीनाक्षी तोडासे, अंकुश कांचनपुरे, नानाजी कुंभलवार, अस्पाक अली लियाकत अली, शांता राऊत, प्रशांत धोंगडे, पवन लाडवे यांनी नेत्रदानाचा संकल्प केला.डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृती दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात १० जून हा दिवस दृष्टीदान दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीच्या संयुक्त विद्यमाने बाह्यरुग्ण विभागामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. राठोड, , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. एम.बी. सुटे, वैद्यकीय अधिकारी नेत्र डॉ. रंजना वाढीवे, अधिसेविका पुनसे, नोडल अधिकारी व्ही.सी. रामटेके, कक्ष परिसेविका ढोबळे यांची उपस्थित होते. प्रास्ताविकात नेत्र शल्यचिकित्सक डॉ. सुटे यांनी नेत्रदान, मोतीबिंदू शस्त्रक्रियेविषयी माहिती दिली. परिसेविका ढोबळे यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी.डी. मडावी, यांनी ‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ या म्हणीनुसार जनतेला जास्तीत जास्त नेत्रदानाचा संकल्प करण्याचे आवाहन केले. डॉ. राठोड यांनी उपस्थितांना नेत्रदानाचा संकल्प करून मरणोपरांत नेत्रदानाचे इच्छापत्र भरून देण्यास सहकार्य करून अंधत्व नियंत्रण करण्यास मदत करावी, असे आवाहन यावेळी केले. संचालन नेत्रदान समुपदेशक पी.एस. काकडे यांनी केले तर आभार नेत्रचिकित्सा अधिकारी ए.एस. वरघट यांनी केले. कार्यक्रमाकरिता दिनेश ठाकरे, मंगेश राऊत, कर्मचारीवृंद आणि रुग्ण उपस्थित होते.(प्रतिनिधी)