शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

फेरफार पंजीसाठी शेतकऱ्यांची झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:05 AM

अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यातच शेतकऱ्याला समुद्रपूर तहसील कार्यालयाच्या अभिलेख विभागातही फेरफार पंजी मिळविण्यासाठी अक्षरश: अधिकाऱ्यांशी झुंडच द्यावी लागत आहे.

ठळक मुद्देतालुका कचेरीतील प्रकार : पीक कर्ज कागदपत्रांचा खर्च हजाराच्या घरात

प्रफुल्ल महंतारे ।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यातच शेतकऱ्याला समुद्रपूर तहसील कार्यालयाच्या अभिलेख विभागातही फेरफार पंजी मिळविण्यासाठी अक्षरश: अधिकाऱ्यांशी झुंडच द्यावी लागत आहे. परिणामी, वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.दहा पंधरा फेरफार पंजीसाठी अर्ज दिलेले शेतकरी आपले काम झाले असेल या आशेने येथे येतात; पण सध्या त्यांना मनस्तापच सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना अभिलेख विभागाच्या दारावर गर्दी करून तास-तास उभे राहत स्वत:चा अर्ज शोधावा लागतो. मोठी माथापच्छी करून अर्ज मिळाल्यावर तो संबंधीत कर्मचाºयांकडे दिल्यानंतर काम होईलच असे नाही. तर त्यासाठी संंबंधीतांशी वेगळे सोपस्कार पार पाडावे लागत आहेत. या कामासाठी शेतकऱ्यांना सध्यात चार-चार तास तहसील कार्यालयातच थांबावे लागत आहे. अर्ज संबंधितांना दिल्यानंतर दोन तासांनी काम पूर्णत्त्वास जात असल्याची हमी मिळते. त्यानंतर पुन्हा एकदा नागरिकांच्या गर्दीत शिरून तासभर धक्के सहन केल्यानंतर फेरफार पंजीची नक्कल हाती पडते. मात्र, ज्यांना अशाप्रकारे गर्दीत शिरणे शक्य नसते त्या महिलांसह वयोवृद्धांना सायंकाळी उशीरापर्यंत ताटकळत रहावे लागत आहे. अशांच्या नावाचा साधा पुकाराही कुणी घेत नाही. अशामच कार्यालय बंद होण्याची घटीका समिप येत असून अनेकांना आल्या पावली परतावे लागत आहे. एकूणच पीक कर्जाच्या कागदपत्रांसाठी शेतकरी झुंजच द्यावी लागत असल्याचे चित्र सध्या समुद्रपूर तहसील कार्यालयात बघावयास मिळत आहे. ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’ अशा घोषणा भाजपा सरकार करीत असले तरी बँकांद्वारे विविध कागदपत्रांची मागणी केली जात आहे. ही कागदपत्रे मिळविण्यासाठी एका शेतकºयाला सध्या सुमारे एक हजार रुपये खर्च येत असून अनेकांना हा खर्च सोसनेही शक्य होत नाही. विशेष म्हणजे, हैसीयत प्रमाणपत्र १०० रूपये, तलाठी कागदपत्रे ५० रूपये, फेरफार पंजी फी ५० रूपये, पंजीची नक्कल शोधून देण्यासाठी अनधिकृत पणे २०० रुपये या शिवाय तालुक्याच्या एका टोकावर असणाऱ्यांना कागदपत्रांसाठी चार चकरा मारणाऱ्या लागत असल्याने प्रवास खर्च ५०० रुपये असा मोठा आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे.सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे हवालदिल झालेल्या अनेक शेतकºयांवर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावले असून फरीदपूर येथील शेतकरी गोविंदा गजभे, मंगरूळचे शेतकरी हुसुकले, शिवनीचे खिळेकर यांना अर्ज करूनही फेरफार पंजी मिळालेली नाही. या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.अर्ज दाखल करणे जिकरीचेचसदर कार्यालयात अर्ज दाखल करणेही त्रासदायक ठरत आहे. काही जण केवळ अर्ज देण्यासाठी आले असतात नागरिकांच्या गर्दीमुळे त्यांना देखील बराच वेळ ताटकळत राहावे लागते. गर्दीत टेबलवरील कर्मचाऱ्यांच्या पुढे गेल्याशिवाय अर्ज घेतला जात नाही.मोठ्या परिश्रमानंतर ज्यांचे काम होते. त्यांच्या चेहºयावर यशस्वीपणे खिंड लढविल्याचा आनंदच बघाला मिळतो हे विशेष.फेरफार पंजी नक्कलीसाठीचे ३५० अर्ज पेंडींग आहेत. त्यापैकी १७५ अर्ज निकाली काढलेले आहेत. पीक कर्ज मेळाव्यात काही कर्मचारी व्यस्त असल्यामुळे कार्यालयीन काम प्रभावीत होत आहे. आवेदन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी लागणारी कागदपत्रे वेळीच मिळतील.- महेंद्र सूर्यवंशी,नायब तहसीलदार,समुद्रपूर.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती