शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांमुळे सामाजिक एकोपा वाढण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

पढेगाव येथे श्री संत वसंतबाबाच्या दत्तपंचमी उत्सवानिमित्त संत वसंतबाबा बहुउद्देशीय संस्था तथा महात्मा गांधी आयुर्वेद वैद्यकीय रुग्णालय तथा अनुसंधान केंद्र सालोड यांच्या वतीने संयुक्तरीत्या सर्व रोगनिदान व आयुर्वेदोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १५० च्या वर रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देरामदास तडस : पढेगाव येथे श्री संत वसंतबाबा दत्तपंचमी महोत्सव; भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : समाजामध्ये धार्मिकतेची आवड निर्माण व्हावी, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमुळे समाज एकत्र येतात. त्यामुळे संस्काराची व संस्कृतीची जपवणूक होते. धार्मिक कार्यक्रमांमुळे अध्यात्म संबंध घट्ट होतात, युवा पिढीतही धार्मिकतेची आवड निर्माण व्हावी यासाठी समाजामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे. धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमुळे सामाजिक एकोपा वाढण्यास मदत होते, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी पढेगाव येथे श्री संत वसंतबाबा दत्तपंचमी महोत्सव कार्यक्रमात केले.पढेगाव येथे श्री संत वसंतबाबा दत्तपंचमी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, तसेच विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा खासदार रामदास तडस यांच्या हस्ते झाला.यावेळी श्री संत सयाजी महाराज, संत वासुदेव महाराज, सरपंच अनंत हटवार, उपसरपंच गोपाल दुधाने, शालीक तडस, रामभाऊ शेंडे, विजय गोमासे, वसंत पंचभाई, शोभा तडस, शरद तडस, तपासे गुरुजी, काळे, दंडारे गुरुजी, ढगे महाराज, अल्लीपूर, साठोणे गुरुजी यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.५२ नागरिकांनी केले रक्तदानपढेगाव येथे श्री संत वसंतबाबाच्या दत्तपंचमी उत्सवानिमित्त संत वसंतबाबा बहुउद्देशीय संस्था तथा महात्मा गांधी आयुर्वेद वैद्यकीय रुग्णालय तथा अनुसंधान केंद्र सालोड यांच्या वतीने संयुक्तरीत्या सर्व रोगनिदान व आयुर्वेदोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १५० च्या वर रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. स्वप्नील बोरगे, दिव्यानी ढासार, विभा तडस, ममता, श्वेता दीक्षित या डॉक्टरांच्या चमूने रुग्णांची तपासणी केली. तसेच मंगळवारला येथील आरोग्य मित्र मंगेश मुडे व संत वसंत बाबा बहुउद्देशीय संस्था व सामान्य रुग्णालय वर्धा यांच्या वतीने संयुक्तरीत्या पढेगाव येथील हनुमान मंदिर परिसरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये प्रामुख्याने पंकज रामदास तडससह सरपंच अनंता हटवार, उपसरपंच गोपाल दुधाने यांनी रक्तदान केले. तसेच बुधवारी दिंडी, मिरवणूक आदी कार्यक्रम झालेत. दिंडी मिरवणुकीमध्ये पढेगाव, चिकणीसह ९२ दिंड्यांनी सहभाग नोंदविला. सजावट केलेले उंट उत्सवातील आकर्षण ठरले. दहीहंडीनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस