शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदीस नकार; शेतकरी उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST

परतीच्या पावसामुळे बाजारात विकायला आलेल्या कापसात काही प्रमाणात आद्रता आहे. त्यातच सीसीआयची खरेदी सुरू झाल्याने चांगल्या भावाच्या आशेने परिसरातील शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे; पण सीसीआयच्या म्हणण्यानुसार कापसातील आठ टक्क्यापर्यंतची आद्रता गृहीत धरून प्रती क्विंटल ५ हजार ५५० रूपये पर्यंतचे भाव देण्याचे ठरले आहे.

ठळक मुद्देरास्तारोको : सीसीआयने सरसकट ५,५५० भाव द्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : कापसाची आद्रता जास्त असल्याने सीसीआयच्यावतीने कापूस खरेदीस नकार देण्यात आला. याच शेतकरी विरोधी निर्णयाच्या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी वर्धा-यवतमाळ मार्गावर सुमारे अर्धातास रास्तारोको आंदोलन केले. सीसीआयने शेतकऱ्यांच्या कापसाला सरसकट प्रती क्विंटल ५,५५० रुपये भाव द्यावा, अशी मागणी या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी रेटली होती. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे आणि पोलिसांच्या मध्यस्थीअंती आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.परतीच्या पावसामुळे बाजारात विकायला आलेल्या कापसात काही प्रमाणात आद्रता आहे. त्यातच सीसीआयची खरेदी सुरू झाल्याने चांगल्या भावाच्या आशेने परिसरातील शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे; पण सीसीआयच्या म्हणण्यानुसार कापसातील आठ टक्क्यापर्यंतची आद्रता गृहीत धरून प्रती क्विंटल ५ हजार ५५० रूपये पर्यंतचे भाव देण्याचे ठरले आहे. यानंतर आठ ते बारा टक्क्यापर्यंतच्या आद्रतेसाठी क्विंटल मागे ५५ रूपये कमी देण्याचे तसेच बारा टक्क्याचे वरती आद्रता असलेल्या कापसाची खरेदी न करण्याचे धोरण ठरले आहे. शासनाचे निर्देशानुसार हे धोरण राबत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या कापसात १४ ते १६ टक्क्यापर्यंत आद्रता असल्याचे कारण पुढे करीत कापूस खरेदी करण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे शेतकºयांचाही पार चढला. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती मिळताच सभापती खडसे व पोलिसांनी मध्यस्ती करीत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या कापसाची आद्रता तीन ठिकाणी तपासण्याच्या सूचना देत आद्रतेबाबचे धोरण ठरल्याचे सांगितले. सीसीआयने शेतकऱ्यांच्या कापसाला सरसकट प्रती क्विंटल ५ हजार ५५० रूपयांचा भाव द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी रेटली होती. या आंदोलनामुळे काही काळाकरिता परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार झाल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :StrikeसंपFarmer strikeशेतकरी संप